खा.लोखंडेंच्या उमेदवारीला शिर्डी मतदारसंघातुनच मोठा विरोध.. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नगर:
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेनेचे(ठाकरे गट) भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भारतीय जनता पक्षाने केलेल्या विविध पातळीवरील सर्वे मध्ये खासदार लोखंडे यांचे विरोधात जवळपास 80% वातावरण असल्याचे बोलले जात आहे आणि त्यामुळे शिर्डी लोकसभेची जागा भाजपने आपल्याकडे घेण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनीही एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून आपली उमेदवारी अपेक्षित ठेवली आहेत. मात्र भाजपने केलेला सर्वे समोर असताना दुसरीकडे आता खासदार लोखंडे यांना स्वपक्षा मधूनच अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांमधूनच तीव्र विरोध पुढे येत असल्याचे पुढे येत आहे.
केवळ मोदी लाटेवर दोनदा निवडून आलेले आणि मतदारसंघात जनतेमध्ये नाराजी असलेले सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी नकोय, त्यांना उमेदवारी देण्याचे घाटत असल्याने आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे पक्षाकडे पाठवलेले आहेत. यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग अजूनच खडतर झाला असल्याचं समोर येत आहे.
लोखंडे नसतील तर मग कोण?
– खा.लोखंडे यांच्या बद्दल जनतेत असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. विविध राजकीय पक्षांनी केलेल्या सर्वे मध्ये खासदार लोखंडे यांची कामगिरी नकारात्मक समोर येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेतल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. त्याचबरोबर लोखंडे यांनाही पक्षातूनच स्थानिक पातळीवर मोठा विरोध समोर येत आहे. अशा परिस्थितीत लोखंडे यांना उमेदवारी मिळणे अशक्यप्राय असल्याचं बोललं जात आहे. मात्र लोखंडे नसतील तर मग शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे दुसरा उमेदवार कोण असा प्रश्न समोर येत आहे आणि जर भारतीय जनता पक्षाने ही जागा आपल्याकडे खेचून घेतलेली असेल तर भाजपाचा संभाव्य उमेदवार कोण यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.
एकूणच लोखंडे यांची उमेदवारी सध्या तरी धोक्यात दिसत असून भारतीय जनता पक्षाशी आणि संघ विचारांशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीला ही उमेदवारी जाहीर करू शकतो आणि ही व्यक्ती माझी प्रशासकीय अधिकारी असल्याचं बोललं जात आहे. महायुती मधील लोखंडेंवर असलेली नाराजीचा सूर आणि उमेदवार उमेदवारांबाबत असलेला तुटवडा पाहता जाहीर होणारा उमेदवाराचे नाव हे भारतीय जनता पक्षाचे धक्का तंत्र असेल असे सूत्रांकडून कळत आहे.
शिर्डी लोकसभा जागेवर भाजपाच्या दाव्या नंतर आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध करत शिवसेना पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले राजीनामे सदाशिव लोखंडे यांच्या एवजी दुसरा सक्षम उमेदवार देण्याची मागणी शिवसैनिकांनी केल्याने लोखंडेच्या उमेदवारी बाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.
होवु घातलेल्या लोकसभा निवडूणकीच्या जागा वाटपा संदर्भात महायुतीतील तिढा आणखी वाढणार असल्याच दिसुन येतय. शिर्डीतुन गेली तीन टर्म शिवसेनाचा उमेदवार लोकसभेवर निवडणुन जात असला तरी शिवसेनेतील फुटी नंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले विद्यमान खासदार सदाशीव लोखंडे यांच्या विरोधातील नाराजी आता समोर येवु लागली आहे. सदाशिव लोखंडेच काम समाधानकारक नसल्यानं आणि मागील दोन वेळा ते केवळ मोदी लाटेत निवडणुन आल्याने या लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीची जागा भाजपाला देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केल्या नंतर त्याला मंत्री राधाकृष्ण विखेंनी पाठींबा दिलाय या मागणीला दोन दिवस न उलटताच आता शिवसेने मध्येच सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यावरुन मतभेद समोर आले आहेत.
आज शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप त्याचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी लोखंडे यांच्या वर अविश्वास व्यक्त करत लोखंडेना पुन्हा उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे.
भाजपाने अबकी बार चारसौ पार ची घोषणा केली असली तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या कोट्यात असलेल्या शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे रिपोर्ट कार्ड समाधानकारक नसल्याने आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने शिर्डीतुन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी एक प्रकारे जाहीरच केली असल्याने महायुतीच्या हातुन शिर्डीची जागा जातेय अस चित्र मतदार संघात आज निर्माण झाल्याने आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी महिला आघाडी जिल्हा प्रमुख अनिता जगताप यांच्याकडे राजीनामे दिल्याने आता महायुतील ही जागा कोणाकडे जाणार आणि उमेदवार कोण असणार या कडे सर्वांच लक्ष लागलय..