जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या कारभारा ची व घडलेल्या घटनांची चौकशी जिल्हाधिकारी मार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना मोबाईल फोन वरून संवाद साधताना दिली. याच दरम्यान रत्नदीप संस्थेचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याला नागपूर येथून अटक करण्यात आले असल्याचा मोबाईलवरून माहीती मिळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मागण्या बाबत लेखी मिळाले की आंदोलन व उपोषण मागे घेतले जाईल असे पांडुरंग भोसले यांनी जाहीर केले. बुधवार आंदोलनाचा नववा दिवस होता.
रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आ. राम शिंदे यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्या बरोबर संवाद साधला. विद्यार्थ्यांनीनी रत्नदीप संस्थेच्या शैक्षणिक, शारिरीक, मानसिक व अर्थीक छळ कसा केला याचा पाढा वाचला. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे तसेच वनविभागाने हरीण पाळल्याचा गुन्हा दाखल केला आहे तसेच एक हरीण संस्थेच्या आवारात पुरले असल्याचे खोदकामात अवशेष आढळून आले आहे.
मोरेच्या अटकेची माहिती येताच विद्यार्थ्यांचा जल्लोष..
आ. राम शिंदे यांच्या मोबाईलवर पोलीसांनी फोन करून रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती मिळताच विद्यार्थी व उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी आभार व्यक्त करून त्याची चौकशी करून फौंडेशनच्या इतर सहा संचालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
आ.राम शिंदेंची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी:
-आ. राम शिंदे यांनी रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला व हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले भेट दिली. यावेळी ते म्हणाले, रत्नदीप शैक्षणिक संस्थेत राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सदर विद्यार्थ्यांबाबत घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. शिक्षण संस्थेसाठी ही काळीमा फासणारी आहे. याबाबत कडक कारवाई व्हावी व आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत दोन दिवसात कारवाई करतो असे सांगितले आहे.
आ.रोहित पवार विद्यार्थ्यांच्या पाठीशी:
-आ. रोहित पवार यांनी दुपारी दुसऱ्यांदा आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन पुणे विद्यापीठ ; रायगड विद्यापीठाकडे फोन करून रत्नदिप संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यास सांगुन उपोषण कर्त्यांना लेखी अहवाल देण्यास सांगितले . व जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हीं आंदोलन कर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार .
यावेळी उपषणकर्ते व शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले म्हणाले की . जोपर्यंत लेखी मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही . त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थीनी आंदोलन व उपोषणावर ठाम राहिले .