Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
9.2 C
New York
Sunday, March 16, 2025

नगर अर्बन बँक घोटाळा: कोठारी, कटारिया, अंदानीचे जामीन अर्ज कोर्टाकडून नामंजूर

“नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा जामिन अर्ज नामंजूर”

नगर:
अहमदनगर येथील 110 वर्ष जुनी नगर अर्बन बँकेत दोनशे एक्कावन कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रूपयांचा घोटाळा प्रकरणी अटक आरोपी क.१) संचालक, अनिल चंदुलाल कोठारी (रा. माणिकनगर), आरोपी क.२ संचालक अशोक माघवलाल कटारिया, (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारने, जि. अहमदनगर), आरोपी क.३ तज्ञ संचालक शंकर घनशामदास अंदानी (रा.भगत मळा, सावेडी, अहमदनगर) यांनी  जिल्हा न्यायालयात जामिन अर्ज दाखल केले होते. या सर्व आरोपींचे जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी नामंजुर केले आहेत.

सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने युक्तीवाद सन २०१४ ते २०१९ या काळात सदर आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्र, मिळकतीचे बनावट अहवाल इतर बनावट कागदपत्रे तसेच अनेक प्रकरणे मंजुर केली. सदर आरोपी यांचे खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे दिसून येत आहे. तसेच ऐपत नसताना अनेक कर्ज मंजुर केलेली दिसत आहे. सदर फॉरेन्सीक ऑडीटमध्ये अनेक कर्ज प्रकरणात आरोपीचा सहभाग दिसून येत आहे.

- Advertisement -

यातील आरोपी हे संचालक असताना गैरव्यवहार केला आहे. तसेच तज्ञ संचालक शंकर अदानी याचे खात्यावर आठ लाख रूपये आल्याचे दिसून आले आहे. सदर प्रकरणात अर्बन बँकेचे अनेक संचालक फरार आहेत. तसेच अशोक कटारिया यांचे खात्यावर ४५ लाख रूपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सरकार पक्षाच्या युक्तीवादावर सदर अर्ज नामंजुर केले आहे. सदर जामिन अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके व मंगेश दिवाणे यांनी युक्तीवाद केला. मुळ ठेविदाराचे वतीने अॅड. अच्युत पिंगळे वकिलांनी युक्तीवाद केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा