नगर:
नितीन भुतारे यांच्यावर मनसे पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असा आरोप करत त्याचा ओ बी सी समाजाच्या वतीने केला जाहीर निषेध करण्यात आला आहे.
माळीवाडा वेस येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्या मुळे सकल ओ बी सी समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल.
मनसे नेते नितीन भुतारे यांनी लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे तसेच सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर कुठलीही चुक नसताना कारवाई केली. हा अन्याय ओ बी सी समाज सहन करणार नाही, सर्व ओ बी सी समाज युवा नेते नितीन भुतारे यांच्या पाठीमागे उभा आहे, सत्य व परखड भूमिका घेणे हे नितीन भुतारे यांचे काम आहे व ते सातत्याने करत आले. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर सकल ओ बी सी समाज सहन करणार नाही असे भरत गारुडकर या वेळी बोलतांना म्हणाले.
या वेळी बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव,परेश लोखंडे राजेंद्र पडोळे, सुरेश चिपाडे, रमेश सानप, सागर फुलसौंदर, मंगेश खंगले, , बाबा पटवेकर, कैलास दळवी, रोहित पठारे, लवेश गोंधळे, माऊली गायकवाड, अनिल इवळे, सुनील भिंगार बनकर रमेश चिपाडे,
कॅप्टन सुधीर पुंड इंजि चंद्रकांत पुंड,
जालिंदर बोरुडे, अमोल भांबरकर, दीपक खेडकर, गणेश बनक सुरेश आंबेकर, गणेश कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, ब्रिजेश ताठे, विशाल वालकर, मनोज गडाळकर आदी उपस्थित होते, असे भुतारे यांच्या कडून प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.