लोणी(प्रतिनिधी):
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चारशे जागा जिंकण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सामुहीक प्रयत्न आणि योगदान महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्यातील ४०नेत्यांचा समावेश असलेली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.यामध्ये मंत्री विखे पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.लोणी येथे जनसेवा कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक सुरू असतानाच केंद्रीय कार्यालयातून याबाबतचा संदेश मिळाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर श्रीरामपूरचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे संगमनेरचे वैभव लांडगे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले गणेश मुदगुले अमोल खताळ सुदामराव सानप नानासाहेब पवार शरद नवले केतन खोरे संदीप चव्हाण युवा मोर्चाचे सरचिटणीस रोहीत चौधरी अध्यक्ष हरीष वलवे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्याची ग्वाही देताना नगर शिर्डी दिंडोरी या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने दिलेली आहेच.याबरोबरीनेच आता पक्षाच्या सूचनेनूसार राज्यातील अन्य ठिकाणी प्रचारासाठी जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुक खूप महत्वपूर्ण आहे.देशाचे भविष्य घडविण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे.यासाठी पक्षाने देशात चारशे आणि राज्यात ४५ जागा जिंकण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मजबूत आशी संघटनात्मक बांधणी केली असल्याने प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुथ रचनेपर्यत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्टार प्रचारक म्ह्णून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करून यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे योगदान सुध्दा खूप महत्वाचे ठरणार आहे.येणार्या काळात बुथ स्तरापर्यत सर्व मतदार आणि लाभार्थी पर्यत पोहचण्यासाठी संपर्क अभियान सुरू केले असून येत्या काही दिवसात सर्व तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांचा संदेश देण्यासाठी अभियान सुरू केले असून या संपर्क अभियानातून बुथ रचनेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.