मुंबई:
राजकारण किती सोयीने करायचे असते याची अनेक उदाहरणे आहेत. राजकारणात कोणी कधी कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो असे म्हणतातच, मात्र राजकीय फायदा-तोट्याचे गणित पाहिले हे जातेच. तसेच काळ आणि वेळेचा महिमाही या निमित्ताने पहावयास मिळतो. 2019 ला युवा स्वाभिमान पक्षाच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष
नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणून आल्या. त्यावेळी एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेना-भाजपची युती होती. आता काळाच्या ओघात 2024 ला प्राप्त परस्थिती पाहून नवनीत राणा या भाजप पक्षात प्रवेश करत अमरावती मधून भाजप उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार आहेत.
गमतीचा भाग म्हणजे ज्या युवा स्वाभिमान पक्षाच्या त्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष होत्या त्या पदाचा आणि पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी पक्षाचे अध्यक्ष असलेले पती आ.रवी राणा यांच्या कडे लेखी स्वरूपात दिला. विशेष म्हणजे आ.रवी राणा हे नवनीत राणा यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते. आणि त्यांनी नवनीत राणा यांना सहकार्य करत निवडून आणण्यासाठी नाराज असलेल्या अडसूळ पितापुत्रांना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विनंती वजा आवाहनकेले आहे.
नवनीत राणा खासदार झाल्यानंतर स्थानिक पातळीवर त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षात आणि भाजपात प्रचंड वाद होते. यातून कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यालय फोडून मारहाण केली होती. मात्र नंतर राणा दांपत्याने भाजपशी जुळवून घेत पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आणि सरकारचे सातत्याने कौतुक केले. आणि आता नवनवीन राणा यांनी पतीच्या पक्षाचा राजीनामा देत भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
राजीनामा पत्र:
मा.श्री आ रविजी राणा संस्थापक अध्यक्ष – युवा स्वाभिमान पार्टी
मा. महोदय,
मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी ची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती, आज दिनांक 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.
पार्टीने आजपर्यंत मला जो मानसन्मान दिला, सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते.
कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे ही विनंती
आपलीच
सौ. नवनीत रवी राणा