नगर:
शासनाच्या निर्देशानुसार ई-कुबेर प्रणालीव्दारे १ एप्रिल २०२४ पासून निवृत्ती वेतनाचे प्रदान करावयाचे असल्याने ई-कुबेर प्रणालीचे कार्यान्वयन, सन २०२३-२४ या वित्तीय वर्षातील माहे मार्च २०२४ अखेरचे प्रशासकीय,वित्तीय कामकाज, ताळमेळ आदी बाबींचा विचार करता माहे मार्च-२०२४ चे नियमित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांचे बँक खात्यात जमा होण्यास अवधी लागण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने माहे मार्च २०२४ चे निवृत्तीवेतन दिनांक ०५ एप्रिल, २०२४ पर्यंत राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, याची सर्व निवृत्ती वेतनधारकांनी कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव-भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.