नगर:
आमदार निलेश लंके यांनी आज शुक्रवारी सुपा येथे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची एक बैठक बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची चर्चा करून निलेश लंके लोकसभा निवडणुकीबाबत आपले पुढील धोरण आणि भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कदाचित निलेश लंके आजच्या बैठकीत आपल्या आमदारकीचा राजीनामा घोषित करतील अशी मोठी चर्चा सुरू झाली असून लंके यांच्या काही जवळच्या व्यक्तींनीही त्यास दुजोरा दिल्याचे बोलले जात आहे.
आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश याबाबत त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून आल्या मात्र त्या दरवेळी निलेश लंके यांनी फेटाळल्याचे दिसून आले.
त्यामुळे आज सुपा येथे होणाऱ्या बैठकीत निलेश लंके काय निर्णय घेणार निलेश लंके राजीनामा देणार अशा बातम्या विविध माध्यमातून येत असल्या तरीही त्याला अद्याप स्वतः लंके यांनी दुजोरा दिलेला नाही. याबाबत त्यांची भूमिका बैठकीनंतरच स्पष्ट होऊ शकेल मात्र नेहमीप्रमाणे आजही निलेश लंके यांनी राजीननाम्या बाबत आलेल्या बातम्या ह्या वावड्याचअसल्याचे सांगितलं तर काय असंही आता बोललं जात आहे.
निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवणार आणि तीही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून हे जवळपास स्पष्ट झाल्याचे चित्र आहे. मात्र लंके याबाबत अद्याप निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र एकूणच कायदेशीर तज्ञांच्या मते निलेश लंके यांना आता राजीनामा देण्याची वेळ आली असून ऐनवेळी राजीनामा देण्यास उशीर झाला आणि विधानसभा अध्यक्षांनी हा राजीनामा स्वीकारण्या ऐवजी प्रलंबितन तसाच बाजूला ठेवून दिला तर निलेश लंके यांच्यासमोर पुन्हा एकदा कायदेशीर अडचणी येऊ शकतात. याबाबत राजकीय कायदेशीर अभ्यासकांचे मतमातांतरे दिसून येत असून आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिल्यानंतर संबंधित सदस्य आपला पुढील निर्णय घेण्यास स्वतंत्र असतो असं काही जणांचं मत आहे. मात्र त्याचबरोबर अध्यक्ष आणि राजीनामा मंजूर केलेला नसल्याची परिस्थिती असेल तर त्याबाबत जुना पक्ष संबंधित सदस्यावर कारवाईचे हत्यार वापरू शकतो आणि याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष आणि त्यानंतर न्यायालयात होऊ शकतो, यामध्ये जाणारा वेळ आणि उडणारा गोंधळ पाहता संबंधित सदस्य किंवा उमेदवाराला कायदेशीर अडचणींच्या पेचात सामोरे जाऊन लागू शकते. अशा वेळी निवडणूक आयोग याबाबत नेमका काय निर्णय घेणार यामध्येही मतमतांतरे असल्याने निलेश लंके यांनी आता वेळ न दवडता तातडीने राजीनामा देऊन आपले पुढील राजकीय सोपस्कार पूर्ण करायला हवेत, असही काही राजकीय कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे एकूणच आज सुपा येथे होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील अशीच दाट शक्यता असली तरी जोपर्यंत स्वतः निलेश लंके याबाबत घोषणा करत नाही तोपर्यंत याबाबतचे गूढ कायम असणार आहे.