पारनेर/सुपा:
नगर दक्षिणेतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना आपली उमेदवारी आणि पक्ष याबाबत प्रचंड गूढ निर्माण करून चर्चेत राहिलेले आ.निलेश लंके यांनी अखेर आज निर्णय घेतल्याचे पुढे येत आहे. सुप्यातील एका मंगल कार्यालयात पारनेर सह जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.
तत्पूर्वी खात्रीशीर सूत्रांनी आणि लंके यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला असल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता बैठक सुरू झाली असून बैठकीत शेवटी स्वतः लंके आपला निर्णय जाहीर करणार आहेत. यावेळी बोलताना अनेक कार्यकर्ते हे भावनिक झाले होते,अनेकांच्या डोळ्यात पाणी होते. यावरून निलेश लंके यांनी मोठा निर्णय घेतला असून त्याची आज घोषणा होणार आहे.