नगर:
शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला अर्थात तुलनात्मक आकडेवारीनुसार अनुसूचित जाती वर्गाची लोकसंख्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात असल्याने अनेक दलित नेत्यांनी शिर्डी मतदारसंघाशी जवळीक साधण्यास सुरवात केली. 2009ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले. त्यानंतर 2014 आणि 2019ला शिवसेने पक्षाचेच सदाशिव लोखंडे हे या ठिकाणाहून खासदार झाले.
एकंदरीत पाहता शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत शिवसेना या पक्षाकडे आता पर्यंत राहिला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती मधील चांभार या समाजातील नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. दुसरीकडे रामदास आठवले सारखे आज केंद्रात मंत्री असलेले आणि एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नेत्यालाही शिर्डी मधून पराभव चाखावा लागला.
आता 2024 च्या लोकसभे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे. या परिस्थितीत आता उत्कर्षा रुपवते या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण तयारीनशी उतरत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
उत्कर्ष रुपवते अर्थात रुपवते कुटुंब हे काँग्रेस पक्षाशी तीन पिढ्यांपासून एकरूप असलेलं कुटुंब आहे. मात्र कुठेतरी काँग्रेस पक्षाकडून सत्तेचा राजकारणात अन्याय झाल्याची भावना आता रुपवते परिवारात आहे आणि त्या अनुषंगाने उत्कर्ष रूपवते यंदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरल्याचे समोर येत आहे. समोरील दोन्ही उमेदवार पाहता या दोन्ही उमेदवारांचा तसा या मतदारसंघाशी संबंध काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सदाशिव लोखंडे हे मूळचे कुठले त्यांचा सर्वाधिक कार्यकाळ राजकीय असो किंवा खाजगी व्यावसायिक असो हा कुठे गेला? त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे हे अकोले तालुक्याचे सुपुत्र असले तरीही ते निवृत्तीपर्यंत एक प्रशासकीय अधिकारी राहिलेत!! अर्थात समाजकारण आणि राजकारण यांच्याशी शिर्डी अनुषंगाने या दोन्हीही व्यक्तींचा पूर्वी कोणताही संबंध आढळून येत नाही अशी मोठी चर्चा आहे. केवळ शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या ठिकाण या ठिकाणाहून लोखंडे आणि वाकचौरे हे निवडून गेलेले दिसून येते. याउलट रुपवते परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून नगर जिल्ह्यात समाजकारण राजकारण आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष जोडला गेलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारांची नाळ या परिवाराने आतापर्यंत जोपासलेली आहे. मात्र वारंवार काँग्रेस पक्षाकडून कुठेतरी सत्तेच्या राजकारणात होणारा अन्याय उत्कर्षा रूपवते यांच्या रूपाने “बगावत” करताना दिसून येत आहे.
त्यामुळेच त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असा चंग बांधल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाला शिर्डीची जागा राखता न आल्याने उत्कर्ष रूपवते यांच्याकडे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित किंवा अपक्ष उमेदवारीचा पर्याय आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच मुंबईत भेटही घेतलेली आहे. त्या नेमक्या कोणत्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवणार याबाबत अध्यापही स्पष्टता नसली तरीही काँग्रेस पक्षाने ही जागा आपल्याकडे का घेतली नाही याची मोठी खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे.
या परिस्थितीमध्ये उत्कर्षा रूपवते यांनी उमेदवारी करणार याची संकेत दिल्याने मतदारसंघातील संभाव्य गणिते मोठ्या प्रमाणात बदलणार याचीही मोठी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळेच उत्कर्ष रुपवते या काय निर्णय घेतात? त्यांनी निवडणूक लढवली तर त्याचा फटका कोणाला बसेल? किंवा जिल्ह्यातील एकनिष्ठ कार्यकर्ता, समाजकारणी, शिक्षण क्षेत्रात नाव असलेल्या परिवार या अनुषंगाने ओळख असल्याने त्या प्रस्थापित झालेल्या दोन्ही उमेदवारांवर मात करण्यात यशस्वी होतील का ? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीचा निकाल काहीही लागो मात्र आज उत्कर्ष रूपवते या जर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या तर अर्थातच शिर्डीची लढत ही दुरंगी न राहता लक्षवेधी तिरंगी लढत होईल आणि यामध्ये कुठेतरी उत्कर्ष रुपवते यांचे पारडे वजनदार राहील अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.