नगर:
आज दि. २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठीक सकाळी ११ वाजता आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी महायुती मधील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते,पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमणार आहेत. येथून ही महारॅली शहरातून फिरणार आहे. या निमित्ताने महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रॅली मार्ग:
अहिल्यानगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन- माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन- पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक- भिंगारवाला चौक- तेलीखुंट- चितळे रोड- स्वा. वीर सावरकर चौक- दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे सभा- जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल..
रॅली वेळ : ९.३०
अर्ज दाखल वेळ: ११.०० वा.