एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती..
संग्राम, संदीप,अक्षय.. भैय्या-दादांचे विरोधकांना जबरदस्त धडकी भरवणारे शक्तिप्रदर्शन..
नगर:
विद्यमान भाजप खासदार सुजय विखे यांनी महायुतीकडून आज आपला लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले, आ.मोनिका राजळे , आ.संग्राम जगताप, आ.बबनराव पाचपुते, बाबूशेठ टायरवाले, प्रवीण गायकवाड, आदींची प्रमुख उपस्थिती होती.


उमेदवारी अर्ज दाखल करणे ही औपचारिकता असली तरी या निमित्ताने नगर शहरातून निघालेली महायुतीची महारॅली ही लक्षवेधी आणि विरोधकांना धडकी भरवणारी अशीच दिसून आली. महायुती मधील सर्व प्रमुख घटक पक्षांचे सर्वोच्च नेते, जिल्ह्यातील आणि शहरातील स्थानिक सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांची लक्षणीय हजारोंच्या संख्येने उपस्थितीमुळे खासदार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना निघालेला लवाजमा हा अचंबित करणारा असाच होता.


एकंदरीतच सुजय विखेंना नगर शहरातून त्याच बरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद यानिमित्ताने दिसून आल्याचं बोललं जात आहे. नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांची एक हाती सत्ता दिसून येत आहे. त्याचबरोबर शिवाजी कर्डिले यांचा असलेला वचक आणि त्यांची कार्यकर्त्यांची फळी आणि त्याचबरोबर अक्षय कर्डिले यांचे युवा संघटन हे या महा रॅलीमध्ये दिसून आले. सर्वात प्रमुख आकर्षण ठरले ते माजी महापौर संदीप कोतकर यांच्या युवा कार्यकर्त्यांचे!! स्वतः संदीप कोतकर या महा रॅलीत उपस्थित नसले तरीही त्यांच्या वतीने त्यांचे समर्थक कार्यकर्ते खासदार सुजय विखे यांच्यासाठी मोठ्या संख्येने यावेळी दिसून आले.

महारॅलीमध्ये संदीप कोतकर अक्षय कर्डिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे बॅनर समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने झळकवत एक वातावरण निर्मिती केली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये उमेदवार खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केल्याचे दिसून आलं. एकूणच नगर शहर आणि नगर तालुक्यातून खासदार सुजय विखे यांना जबरदस्त आणि मोठा प्रतिसाद आजच्या उमेदवारी अर्ज भरताना च्या वेळी निघालेल्या महा रॅली मधून दिसून आला याच पद्धतीची महाभव्य रॅली पारनेर शहरांमध्ये लवकरच निघणार असल्याचे सुतोवाच देण्यात आलेले आहे.


