नगर:
भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी शहर भाजपच्या वतीने शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरी नेता सुभाष चौकात अली असता तेथील शिवसेनेच्या कार्यालया जवळ लावलेल्या उपनेते स्व.अनिल राठोड यांच्या फोटो समोरे उभे राहत त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत अमर रहे अमर रहे अनिलभैय्या अमर रहे अशाही घोषणा देण्यात आल्या.
स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर व शिवसेनेत दुफळी झाल्यावर येथील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटात आहे. या निवडणुकीत महाआघाडीचा उमेदवार असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. अनिल राठोड यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या आहेत. याची बराच वेळ याभागात चर्चा होत होती.
यावेळी शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिंदे गटाच्या शिवसेनाना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी उपमहापौर मालन ढोणे, आनंदा शेळके, प्रशांत मुथा, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, प्रदीप परदेशी आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
2019 लोकसभा निवडणुकीत एकत्रित असलेली शिवसेना आणि भाजपची युती होती. त्यावेळी अनिल भैय्यांनी सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मोठी मेहनत घेतली होती. शहरातून विखेंना मतांची आघाडी मिळाली होती. शिवसेनेतील फुटी नंतर राठोड यांना मानणारा शिवसेनेचा गट उद्धव ठाकरेंसोबत असून मविआचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारात हिरीरीने उतरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप रॅली नेता सुभाष चौकात शिवालय इथे आल्यानंतर अनिल भैय्यां अमर रहे अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आल्याने याची चर्चा होत आहे.