नगर:
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी रविवारी मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आग्रही मागणी करत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे छत्रपती संभाजी नगर मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या अनुषंगाने उत्कर्षा रुपवते यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. याबाबत रुपवते यांनी,
गरजवंत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारणारे संघर्षयोद्धे मनोज दादा जरांगे-पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल आहेत, असे सांगत काल(28 एप्रिल 2024) त्यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि आशिर्वाद घेतल्याचे सांगितले.
यावेळी दादांना साईबाबांची मूर्ती भेट दिली आणि लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. मराठा अरक्षणाला पाठींबा देण्यासाठी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात आंदोलनकर्त्या तरुणांना भेटले होते. त्यावेळी युवावर्गात आणि एकूणच समाजामध्ये जरांगे पाटील दादांबद्दल असलेल्या अफाट श्रद्धेची भावना मी जवळून अनुभवली आहे., अशी भावना उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केली आहे.
दादा लवकर बरे व्हा, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हांला गरज आहे., असेही उत्कर्षा प्रेमानंद रूपवते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.