नगर:
पारनेर भाजप तालुकाध्यक्ष आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यात विरोधकांसमोर आव्हान निर्माण करणारे राहुल शिंदे यांच्यावर मतदानाच्या पूर्व रात्रीला हल्ला झाल्याचे समजत आहे. या संदर्भात समाजमाध्यमातून व्हिडीओ व्हायरल झाले असून राहुल शिंदे यांच्यावर लंके समर्थकांकडून हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. तर लंके समर्थकांकडून शिंदे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत लंके समर्थकांच्या गुंडगिरीचा पुन्हा एक नवा एपिसोड समोर आल्याचे महायुतीकडून सांगण्यात येत आहे. पारनेर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष राहूल शिंदे यांच्यावर लंके समर्थकंनी गाडी अडवून हल्ला केला. पराभव समोर दिसू लागल्याने आता आशा गुंड प्रवृतीतून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे उघड झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून राहूल शिंदे यांना जाणीवपुर्वक लक्ष बनवून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी सुध्दा शहर आणि तालुक्यात आशाच पध्दतीची दहशत निर्माण करून मतदार संघातील वातावरण कुलषित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. शहरात प्रचार फेरी दरम्यान एका कुंटूबाला झालेली मारहाण तसेच महायुतीच्या उमेदवारला यापुर्वी जीवे मारण्याची लंके समर्थकांकडून आलेली धमकी गंभीर आहे असे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी काही रक्कम रस्त्यावर पडल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही रक्कम शिंदे यांच्याकडची असे सांगितले जात असताना विरोधकांनी गाडीत पैसे न सापडल्याने पैसे टाकल्याचा आरोप केला जात आहे. या बाबत परस्पर आरोप सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे.