खा.निलेश लंकेंनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट.. भेटीत खा.लंकेंचा सत्कार..
भेट आणि सत्काराचा व्हिडीओ व्हायरल..
मिटकरी, विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी..
खा.निलेश लंकेंनी स्पष्टीकरण द्यावे.. राजकीय वर्तुळातून मागणी..
नगर:
दोन वेळेस मोक्काची कारवाई झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे याची भेट घेतली आहे. भेटीत गजा मारणे या
ने खा.निलेश लंके यांचा भगवी शाल आणि श्रीफळ देत सत्कार केला आहे. या भेटीचा व्हिडीओ समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल होत असून वृत्त वाहिन्यांवर या भेटीबाबत बातम्या प्रसारित झाल्या आहेत.
खा. निलेश लंके हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदातसंघातुन निवडून आले आहेत. मविआ कडून लंके यांनी महायुतीचे डॉ.सुजय विखे यांचा पराभव केल्याने लंके पुन्हा चर्चेत आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी खा. लंके यांनी दिल्लीत जात संसद भवनास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पुण्यात कुख्यात गुंड असलेल्या गजा मारणे याची भेट घेतल्याने ही भेट चर्चेत आली आहे. यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
आ.अमोल मिटकरी यांची भेटीवर टीका:
-तुतारीवाले शालीन वक्ते आता कुठे लपले. पार्थ पवारांनी भेट घेतली होती त्यावेळी पार्थची चूक झाली असे अजित पवार यांनी मान्य करत स्पष्टीकरण दिले होते. आम्हांला प्रश्न पडला आहे की गुंडांचा वापर बारामती, अहिल्यानगर मध्ये अनेक घटना घडल्या. एका महिलेला मारहाण झाली. याचा काही संबंध आहे का. पवार साहेब हे पहात असतील. आता तुतारीवाल्या सोजवल नेत्यांनी बोलावे. गजा मारणे कोण हे सगळ्यांना माहीत आहे. पाहू ते चूक मान्य करतात का? असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
विद्या चव्हाण: निश्चितच हे चुकीचे आहे:
-मी त्निलेश लंके यांना विचारेन की का भेट घेतली. काय गरज पडली. कोणत्याही लोकप्रतिनिधीने गुंडां कडून सन्मान स्वीकारणे हे चूक आहे. त्यांना माहीत नव्हते का? माहीत असूनही भेट घेतली का? हे त्यांना विचारेन, मात्र हे चूक आहे. लंके हे साधे सरळ आहेत,धार्मिक आहेत, चुकून झाले असेल तर लंके यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी माध्यमांना दिली आहे.