नाशिक शिक्षक मतदारसंघातील समता पार्टीचे उमेदवार भागवत गायकवाड यांना शिक्षक मतदारात पसंती..
नगर:
शिक्षक मतदार संघातील मतदान यादीत अनेक प्रायव्हेट शिक्षण संस्थांचे अस्थायी असलेले शिक्षक हे मतदार झालेले आहे. तीन वर्षे ते काम करत असल्याचा पुरावा संस्था चालकांनी व मुख्याध्यापकांनी त्यांना मतदार करण्यासाठी शासनाकडे जमा केलेला आहे. शिक्षक मतदार यादीत त्या अस्थायी शिक्षकांचे नावहि आलेले आहे. मला आमदार करा मी सर्व प्रायव्हेट शिक्षण संस्था मधील अस्थायी शिक्षकांना पर्मनंट करण्यासाठी काम करेल असे आश्वासन नाशिक शिक्षक मतदारसंघातील समता पार्टीचे उमेदवार भागवत गायकवाड ह्यांनी वृत्त प्रतिनिधीशी बोलतांना भावना व्यक्त केले.
नाशिक शिक्षक विभागातील मतदार यादीत शिक्षक मतदारांची संख्या मोठी आहे परंतु त्यात अस्थायी स्वरूपात म्हणजे कायम स्वरुपातील नसलेले शिक्षक हे मोठे प्रमाणात आहे. शिक्षक मतदारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पगार ही भेटत नाही. अनुदानित शिक्षकांच्या ही अनेक मागण्यांकडे सर्व राजकीय पक्ष दुर्लक्ष करत आहेत. प्रायव्हेट शिक्षण संस्था मध्ये शिक्षक भरतीवर शासनाचे नियंत्रण नाही. पगारा बाबत नियंत्रण नाही मला नाशिक शिक्षक मतदारसंघातुन आमदार शिक्षकांनी केले तर सर्व शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायासाठी अहोरात्र कामकाज करेल. फक्त शिक्षकांच्या हक्कासाठी शासन दरबारी लढा देईल असे समता पार्टी नाशिक शिक्षक मतदार संघाचे उमेदवार भागवत गायकवाड ह्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना भावना व्यक्त केले.
नाशिक विभागीतील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गांस त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षण व शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मोबदला देण्यासाठी लढा हा समता पार्टीचा विचार आहे. शैक्षणिक संस्था चालकांच्या दबावाला बळी न पडता. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संविधानीक अधिकारांचा फायदा घेऊन शिक्षक मतदार संघात मतदान करा व मला शिक्षकांनी निवडुन द्यावे असे भागवत गायकवाड यांनी सांगितले.