श्रीरामपूर:
राष्ट्रीवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी लकी सेठी तर तालुकाध्यक्षपदी शिवाजी शेजुळ यांची नियुक्ती करण्यात आली निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष संदिप वर्पे यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांचे हस्ते देण्यात आले आहे.
शहराध्यक्षपदी निवड झालेले लकी सेठी हे सामाजिक कार्यकर्ते असून सिख समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत गेले तीस वर्षापासून सामाजिक कार्यात असून पिपल्स बँकेचे संचालक, राष्ट्रीय क्रीडा परिषदेचे सदस्य ,नगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे यापूर्वीही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषविलेले आहेत त्यांनी कोविड काळात केलेले अन्नदानाचे कार्य शहरातील नागरिक विसरू शकत नाही त्याकाळात त्यांनी कोविडची कोणतीही भीती न बाळगता ज्यांला गरज आहे त्यांना घरपोच दवाखान्यात जेवणाची डबे पुरविले.
तालुकाध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी शेजुळ यांनी यापूर्वी अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले आहे. निमगाव खैरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तालुक्यातील प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने विजय होऊन लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सेवा संस्थेचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे . शिवाजी शेजुळ यांनी निमगाव खैरी येथे कोविड काळात तालुक्यात प्रथम कोविड सेंटर सुरू करून परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांना त्यांनी औषधे उपचारास मदत केली तसेच जेवणाची मोफत सोय करून दिली. अनेक रुग्णांना इतर हॉस्पिटलाल उपचारासाठी मदत केली. पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवली होती .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष लकी सेठी, तालुकाध्यक्ष शिवाजी शेजुळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुभाष आदिक, सुरेश पाटील निमसे, नाना तुपे, राजेश साबळे, संजय कालंगडे ,वेणूनाथ कोतकर, बबनराव चोथे , नवनाथ कोतकर, गणेश कोतकर, राजेश बोर्डे, शफी शहा, सेंटी सेठी, गुलशन कंत्रोड ,राजेंद्र सलालकर, विश्वास वाघमारे ,सुरेश ताके ,गुरचरण भटीयानी ,कैलास कणसे, सोन्याबापू शिंदे, रोनित घोरपडे, भूषण मुंजाळ,त्रिंबक उंदरे, इम्रान पटेल, समीर शेख, कुंडलिक काळे, भागचंद उंदरे, रिपी चुग, विकी ठकराल, बाबा उघडे, विठ्ठल झुराळे, संजय तरस, अंकुश पवार, अवतार नागपाल ,कुलवतसिंग सेठी, बंटी गुरुवाडा आदींनी अभिनंदन केले.