नगर:
विधानपरिषद नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाला असला तरी अपक्ष उमेदवार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पराभवाची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यंदाच्या निवडणुकीत एकीकडे महायुती-मविआ यांच्यातील उमेदवार असले तरी अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे बाजी मारणार का या बद्दल मोठी उत्सुकता होती. त्यांनी प्रचाराच्या निमित्ताने मोठी यंत्रणा उभी करत पाचही जिल्ह्यात प्रभावी प्रचार राबवला. मूळ भाजप नेते असताना त्यांनी महायुतीच्या विरोधात एक प्रकारे एल्गार पुकारला. अपक्ष असतानाही कोल्हे यांनी अटीतटीची लढत दिली. कोल्हे यांच्या पराभव होण्यामागे अनेक कारणे असली तरी पराभव झाल्यानंतर त्यांनी आपल्या पराभवाचे एक कारण स्पष्ट केले आहे.
विखे-कोल्हे राजकीय सख्य कसे आहे याची उघड चर्चा नेहमीच होत असते. 2019 च्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवा नंतर भाजप या एकाच पक्षात असलेले विखे-कोल्हे यांचा राजकीय संघर्ष प्रकर्षाने सुरू झाला असल्याचे मधल्या काळात गणेश कारखाना, लोकसभा निवडणूक, शिर्डी कामगार संघटना निवडणूक आदींच्या निमित्ताने पहावयास मिळाले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर हा संघर्ष अजून वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान कोल्हे कुटुंब महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त होते. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भुसे आदींनी कोल्हे कुटुंबाची स्वतंत्र भेट घेत त्यांची समजूत काढल्याचे बोलले जात होते. विवेक कोल्हे यांना “नाशिक शिक्षक” साठी भाजप अर्थात महायुती कडून उमेदवारीची अपेक्षा होती. त्या दृष्टीने कोल्हे प्रचाराला लागले होते. मात्र किशोर दराडे यांना महायुतीकडून उतरवण्यात आल्यानंतर विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आणि कडवी लढत दिली. या दरम्यान काँग्रेसचे जेष्ठनेते थोरात यांचा आशीर्वाद नेमका कुणाला होता याबद्दलही चर्चा झाली.
नाशिक शिक्षकची मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट झाले असून विवेक कोल्हे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. या निकालानंतर विवेक कोल्हे यांनी समाजमाध्यमातून एक पोस्ट करत आपल्या प्रचार प्रक्रियेत आणि मतदान करणाऱ्या शिक्षक, शिक्षक संघटना आदींचे आभार मानले आहे. आपल्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना कोल्हे यांनी आपल्याला प्रचारासाठी अत्यल्प वेळ मिळाल्याचे सांगितले आहे. केवळ 25 दिवसातच आपण ही निवडणूक उभी करण्याचा चांगला प्रयत्न केला. कमी वेळ असताना प्रचारात आपल्याला अनेकांनी सहकार्य करत मदत केली, आपल्या विजयासाठी अनेकजण झटले. मात्र निवडणुकीत हार किंवा जीत असते. त्यामुळे जरी पराभव झाला असला तरी आपण खचलो नसून समाजसेवेचे व्रत पुढेही सुरू राहील अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये विवेक कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना..
-नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जरीही आपल्या अपेक्षेप्रमाणे लागला नसेल मात्र आपण दुसऱ्या पसंतीवर स्थान मिळवले आहे. गेले काही काळ दिवस रात्र एक करून प्रचारात उतरलेले कोपरगावसह परिसरातील सर्व शिक्षक बांधव, शिक्षक संघटना, युवा सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ देणारे नागरिक यांचे आभार मानतो, कारण तुम्ही सर्वांनी अतिशय अल्पावधीत केवळ 25 दिवसातच आपण ही निवडणूक उभी करण्याचा चांगला प्रयत्न केला. अपक्ष मैदानात उतरून कडवी झुंज देत अनेक प्रसंगाना तोंड देऊन आपण सर्वांनी अखेर पर्यंत जिद्द सोडली नाही. मतदारसंघात पाचही जिल्ह्यात प्रचारा दरम्यान जीवाभावाचे सहकारी, चांगल्या संस्था आणि अभ्यासू मान्यवर जोडले गेले ही भविष्यासाठी दीर्घकाळ ऊर्जा देणारी मौल्यवान संपत्ती आहे असे मानतो. अनेकांची मोलाची साथ मिळाली ती कायम स्मरणात राहील. समाजहितासाठी लढणे, संघर्ष करणे हा आपला पिंड राहिला आहे. स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. हार जीत हा निवडणुकीचा नियम असतो, कुठलाही पराभव कायमचा नसतो त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक नेटाने सेवा हाच धर्म मानून आपण आजवर जसे काम करत आलो तसेच यापुढेही करत राहू..
मनःपूर्वक आभार..
नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जरीही आपल्या अपेक्षेप्रमाणे लागला नसेल मात्र आपण दुसऱ्या पसंतीवर स्थान मिळवले आहे. गेले काही काळ दिवस रात्र एक करून प्रचारात उतरलेले कोपरगावसह परिसरातील सर्व शिक्षक बांधव,शिक्षक संघटना, युवा सहकारी,पदाधिकारी,कार्यकर्ते,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ देणारे नागरिक यांचे आभार मानतो,कारण तुम्ही सर्वांनी अतिशय अल्पावधीत केवळ २५ दिवसातच आपण ही निवडणूक उभी करण्याचा चांगला प्रयत्न केला.अपक्ष मैदानात उतरून कडवी झुंज देत अनेक प्रसंगाना तोंड देऊन आपण सर्वांनी अखेर पर्यंत जिद्द सोडली नाही.मतदारसंघात पाचही जिल्ह्यात प्रचारा दरम्यान जीवाभावाचे सहकारी,चांगल्या संस्था आणि अभ्यासू मान्यवर जोडले गेले ही भविष्यासाठी दीर्घकाळ ऊर्जा देणारी मौल्यवान संपत्ती आहे असे मानतो.अनेकांची मोलाची साथ मिळाली ती कायम स्मरणात राहील.
समाजहितासाठी लढणे,
संघर्ष करणे हा आपला पिंड राहिला आहे.स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.हार जीत हा निवडणुकीचा नियम असतो,कुठलाही पराभव कायमचा नसतो त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक नेटाने सेवा हाच धर्म मानून आपण आजवर जसे काम करत आलो तसेच यापुढेही करत राहू..
-विवेक बिपीनदादा कोल्हे
#VivekKolhe #माणूस_कामाचा_मित्र_हक्काचा #VidhanParishadElection2024 #TeachersConstituencyNashik #TeachersConstituencyNashik