गुरुपौर्णिमेच्या पहाटे मुंडे, गोकुळ दौंड भगवानबाबा गडावर..
नगर:
आज रविवार गुरुपौर्णिमा.. या निमित्ताने प्रत्यके व्यक्ती आपण मानत असलेल्या गुरूच्या चरणी लीन होत गुरूंचा आशीर्वाद घेत असतात. गुरूंना गुरुमावली म्हंटले जाते, कारण आई जशी आपल्या मुलाच्या चुका पोटात घेत त्याच्यासाठी नेहमीच शुभकामना वंदीत असते. मुलाचे दुःख ते आपले दुःख आणि मुलाचा आनंद, यश, कीर्ती ती आपलीच ही भावना जशी आईची असते तडवत: श्री गुरू आपल्या भक्तांना नेहमी आपल्या प्रेमाच्या पंखाखाली घेत कृपा दृष्टीची सावली बखरत असतात.
हेच औचित्य साधत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पहाटे रविवार प्रारंभ होताच १२ वाजून ०२ मिनिटांनी भगवानबाबा गडावर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे पदस्पर्श करत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.
यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ(भाऊ) दौंड उपस्थित होते. गोकुळ दौंड हे नेहमीच भगवानबाबा गड आणि न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या सहवासात आणि संपर्कात असतात. तसेच गोकुळ(भाऊ) दौंड यांचे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध सर्वश्रुत आहेत. या अनुषंगाने न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद मुंडे आणि दौंड यांनी घेतले.
गोकुळ दौंड यांना कुणा-कुणाचा आशीर्वाद!!
-गोकुळ दौंड हे पाथर्डी-शेवगाव मतदातसंघातील एक महत्वाचे राजकीय नेते असून त्यांच्या कुटुंबाने पाथर्डी पंचायत समितीत अनेक वर्षे सत्ता हातात ठेवली आहे. भारतीय जनता पक्ष आणि मुंडे परिवाराशी दौंड यांचे निकटचे आणि पारिवारिक संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर गोकुळ(भाऊ)दौंड येणारी विधानसभा निवडणूक लढवणारच अशी परस्थिती दिसून येत आहे. दौंड हे भारतीय जनता पक्षात असले तरी त्यांचे विद्यमान भाजप आ.मोनिकताई राजळे यांच्याशी सख्य दिसून येत नाही. पक्ष संघटन आणि पदाधिकारी निवडीवरून अनेकदा दोहोंमधील तुतू-मैमै जाहीरपणे पुढे आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड यांनी महायुतीतीलच कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या सोबत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थिती लावली आहे. त्यामुळे दौंड यांनी येणारी विधानसभा निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढवायची असा चंग बांधला असून त्याची रणनीती ते करताना दिसून येत आहे.