दिल्ली: येत्या 22 जानेवारी रोजी आयोजित अयोध्ये मधील श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून यासाठी श्री राम जन्मभूमी न्यासाच्या वतीने देशातील विविध मान्यवरांना आमंत्रण धाडले आहे. सध्या कोणत्या राजकीय नेत्याला आमंत्रण मिळाले किंवा नाही मिळाले यावर मोठी चर्चा माध्यमात होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका आता अगदी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून अयोध्येमधील वाद चर्चेत राहिला. यात आखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत अयोध्येतील या भूमीवर श्रीराम मंदिर होते असा निष्कर्ष दिला. त्यानंतर श्री राम जन्मभूमी मंदिर न्यासाची स्थापना झाली. या न्यासाच्या माध्यमातून आता भव्य दिव्य असे श्रीराम मंदिर पूर्णत्वास येत असून येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या मंदिरात मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
या पार्श्वभूमीवर देशातील एकूणच राजकारण गरम असून हा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी यापूर्वीच अनेकदा केला आहे. त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या अनेक राजकीय नेत्यांना, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्याचे विशेष आमंत्रण देण्यात आलेले आहे. यामध्ये सिने नाट्य त्याचबरोबर अनेक खेळाडूंना ही निमंत्रण देण्यात आलेले आहे.
या भव्य दिव्य अशा सोहळ्यासाठी विरोधी पक्ष उपस्थित राहणार किंवा नाही अशी चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यात देशातील सर्वात महत्वाचा विरोधी पक्ष नेता असलेला काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार यावर मोठे कुतूहल देशात आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाने आपली भूमिका याबाबत स्पष्ट केलेली आहे.
अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी ज्ञासाच्या वतीने या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या गट अध्यक्ष नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील गटनेते अधिरंजन चौधरी यांना विशेष निमंत्रण देण्यात आलेले होते. मात्र आता काँग्रेस पक्षाच्या वतीने न्यासाच्या वतीने दिलेलं हे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारल्याचं जाहीर केले आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष असा असल्याने हा कार्यक्रम आम्ही सन्मानपूर्वक नाकारत असल्याची भूमिका काँग्रेसकडून आता स्पष्ट करण्यात आली आहे.