नगर(प्रतिनिधी):
आमदार अपात्रता निर्णयाला सर्व काही स्क्रिप्टेड असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. याला आता भाजप खा.सुजय विखे यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा सखोल अभ्यास करून सुनावणीत सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला आहे. जवळपास सव्वा तास त्यांनी निकालाचे वाचन केले. इतिहासात इतक्या प्रदीर्घ काळ कुठल्याही अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. त्यामुळे अध्यक्षांचे अभिनंदन केले पाहिजे. लोकशाहीत ज्याला आक्षेप असेल त्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मात्र विनाकारण आरोप करण्याची सवय विरोधकांना आहे असे खा.विखे म्हणाले.
महाराष्ट्रात जे काय घडलं त्याला काय म्हणणार..
-शरद पवार यांनी अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयाला “स्क्रिप्टेड” म्हणत टीका केली होती. त्यावर खा.सुजय विखे यांनी कदाचित त्यांनाही ही स्क्रीप्ट अगोदरच मिळाली असेल असे म्हणत महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व पवार साहेबांनीच घडवून आणले असे लोकं म्हणतात. त्यांनी लिहलेल्या स्क्रिप्ट नुसारच त्यावेळी सर्व काही घडले असे म्हणले जाते, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना काही अर्थ नसतो., असा टोला खा.विखे यांनी लगावला. लागलेला निकाल अगदी स्वागतार्ह आहे अशी पुष्टी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
संजय राऊतांना प्रतिटोला!!
-शिवसेना उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांनीही मॅच फिक्सिंगच्या केलेल्या आरोपावर बोलताना खा.विखे यांनी त्यांना मॅच फिक्सिंगचा अनुभव असावा असे म्हणत 2019 ला निकाल लागण्या अगोदरच त्यांनी राष्ट्रवादी बरोबर फिक्सिंग केले होते असे म्हणत राउतांवर पलटवार केला.