नगर(प्रतिनिधी):
नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नांतुन प्रभाग क्रमांक 5 मधील 4.87 कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने पूर्ण झालेल्या विकासकामांचा भुमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच सर्व नागरीकांना खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्फत मोफत साखर व डाळ वाटप कार्यक्रम आज शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती भाजपचे जेष्ठनेते महेंद्र भैय्या गंधे यांनी दिली आहे.
दिनांक 19 जानेवारी रोजी 3.30 ते 5.30 या वेळात जॅागिंग ट्रॅक ग्राउंड, प्रोफेसर कॅालनी येथे साखर वाटप आणि विविध विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन संपन्न होईल. तरी प्रभाग5 मधील सर्व नागरिकांना सदर कार्यक्रमास आपण वेळेवर उपसथित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भैय्या गंधे (विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मा.नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष), मनोज दुलम (मा.नगरसेवक तथा मा.सभागृह नेते),
आशाताई कराळे (मा.नगरसेविका तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्या), सोनाबाई शिंदे (मा.नगरसेविका तथा मा.सभापती महिला बालकल्याण) यांनी तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आले आहे.
धान्य मिळण्यासाठी कार्यक्रमास येतांना सोबत ओरीजनल रेशन कार्ड व त्याची झेरॅाक्स घेउन यावी असे सांगण्यात आले आहे.