परदेशी महिलांनाही भारतीय सणाचे आकर्षण, मकर संक्रांती निमित्त जामखेड येथील विठ्ठल मंदिरात लुटला मकर संक्रांतीचा आनंद
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
जामखेड – मकर संक्रांतीच्या सणा निमित्त महिला शहरातील मंदिरात जाऊन देवाला वाण अर्पण करून अभिवादन करतात व महिला हळद कुंकू लावून तिळगुळ वाटप करून संक्राती सणाचा आनंद लुटतात. मकर संक्रांतीच्या या पारंपरिक पध्दतीला डॉ. आरोळे हॉस्पिटल येथे प्रशिक्षणा साठी आलेल्या महिलांना या सणाची भुरळ पडली व त्यांनी साडी नेसून संक्रांतीचा वाणाचा आनंद सोमवारी लुटला.
मकर संक्रात सण हा महिलांचा मोठा सण असतो. या सणासाठी महिला चारपाच दिवसापासून तयारी चालू असते. सोमवारी महिला मकर संक्रातीच्या सण साजरा करण्यासाठी मंदीरात जातात. विविध कारणांनी जामखेड येथील डॉ. अरोळे हॉस्पिटल येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना भारतीय सण उत्सवांचे आकर्षण राहीले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी डॉ. अरोळे हॉस्पिटल येथे आलेल्या परदेशी महिलांना या सणाचा आनंद मिळावा म्हणून डॉ. अरोळे हॉस्पिटलमधील अंगणवाडी शिक्षिका मिना नायडू यांनी अमेरिकेतील युलाॅन युनिव्हर्सिटी मधील प्रशिक्षणासाठी आलेल्या परदेशी महिलांना मकर संक्रांतीच्या सणा निमित्त अस्सल महाराष्ट्रीयन पेहराव असलेली साडी घालून व विविध वाणाचे ताट देऊन त्यांना जामखेड शहरातील विठ्ठल रूक्मिणी मंदीरात हळदी कुंकू व तिळगुळ वाटप साठी आणले यावेळी त्यांनी भारतीय महिला समवेत मकर संक्रात सणाचा आनंद लुटला.
यावेळी युलॉन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका अमेंडा टेपलर म्हणाल्या की, आम्ही सर्व माहिला मकर संक्रांतीच्या सणात सहभागी झालो. तसेच या सणाचा आनंद साजरा करु शकलो. याचाआम्हाला खूप आनंद झाला. तसेच जामखेड येथील माहिलांनी आमचे मोठ्या उत्साहात स्वागत करून विठ्ठल – रुक्मिणी येथे देवांचे दर्शन घडवले. याचाही खूप आनंद वाटला. यावेळी उपस्थित माहिलांनी संक्रांत सणाबद्दल बद्दल माहिती दिली. भारत देशाच्या संस्कृतीने मी प्रभावित झाले.
यावेळी मिना नायडू , उमा कोल्हे, पूजा डिसले, अमेंडा टेपलर, सिल्बीया मिनोद तसेच जामखेड शहरातील माहिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.