आमंत्रण असूनही अयोध्येला न जाणाऱ्या नेत्यांना, दीपक केसरकरांनी “त्यांना” रामाचे बोलावणे नसेल, असे म्हणत लगावला टोला
#आमदारांना लोकसभेला उतरवण्या बाबत मुख्यमंत्री शिंदेच निर्णय घेतील.. केसरकर यांची माहिती
शिर्डी(प्रतिनिधी):
अयोध्येत 22 जानेवारीला श्रीराममंदीर मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काहींनी आमंत्रण मिळूनही जाणार नसल्याच म्हटलय यावर बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना, जस शिर्डीला साईबाबांच बोलवणे आल्या शिवाय येण होत नाही. तस त्यांना रामाच बोलवण आल नसेल अशी कोपरखळी मारलीय. काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींना श्रीराम मंदिर न्यासाकडून निमंत्रण असताना या नेते मंडळींनी सोहळ्याला जाण्याचे टाळले आहे.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज शिर्डीत येवून साई मंदिरात येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले साईबाबांच्या समाधीवर शॉल चढवलीय.राम मंदिराचा मोठा उत्सव देशभरात साजरा केलाय जातोय. प्रत्यकाने मंदिरात जावुन आपल्या पध्दतीने थोडी साफसफाई केली पाहिजे. मी ही मुंबादेवी मंदिरात जावुन साफसफाई केली होती. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर केसरकर यांनी द्वारकामाईत जावुन झाडु हातात घेत सफाई केली. आज साई मंदीरात साफसफाई करण्याची संधी मला मिळाली असल्याच मंत्री दिपक केसरकर म्हणाले आहे. आपल्याला मिळलेली मंदिरे हा ऐतिहासिक वारसा आहे आपण स्वच्छ ठेवले पाहिजे आणि आपले विचारही स्वच्छ ठेवले पाहिजे अस मत केसरकर यांनी व्यक्त केलय
साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या नियोजित मुंबई मार्च बाबत बोलतांना मराठवाड्यात कुणबी दाखले देण्यास सुरवात झालेली असून मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य झालेली आहे. स्वतंत्र आरक्षणाची कारवाई क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्या मान्य झालेला आहे. असेही यावेळी केसरकर म्हणाले आहे.
भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान मध्ये नवीन चेहर्यांना तसेच खासदारांना निवडणुकीत उतरवले होते. याच धर्तीवर राज्यात शिंदे शिवसेना उमेदवार देणार का? यावर बोलतांना केसरकर म्हणाले की , लोकांना नवीन चेहरे पाहिजे असल्यानं काही आमदारांना खासदार बनवले तर काही खासदारांना आमदार बनवले असे बदल केले तर यश येते असे मध्यप्रदेश आणि राज्यस्थान मध्ये भाजपने केलेल्या प्रयोगा मध्ये सिद्ध झाले झाले आहे. भाजपने घेतलेला निर्णय शिंदे शिवसेना घेणार का ? यावर बोलतांना केसरकर म्हणाले की याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, मी फक्त प्रवक्ता आहे शिंदे बोलतील तो निर्णय घेणे माझे काम आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे , कोण उमेदवार आहे तो महत्वाचा आहे आम्ही सगळे उमेदवार निवडून आणणार असल्याचही केसरकर म्हणाले आहे.