द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हरसिटी पॅरिस, फ्रान्स यांच्याकडून आ.निलेश लंके यांना समारंभपूर्व डॉक्टरेट प्रदान..
पारनेर(प्रतिनिधी):
द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हरसिटी पॅरिस, फ्रान्स यांच्याकडून पारनेर-नगर मतदार संघांचे विधानसभा सदस्य मान.आमदार श्री.निलेशजी लंके साहेब याना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
कोरोना रेस्कयू ऑपरेशन्समधील योगदानाच्या विशेष समाजसेवेतील कार्यासाठी होनोरीस कॉसा डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे.
पॅरिस विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले आमदार म्हणून गौरव झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आ.डॉ. निलेश लंके यांच्या बद्दल..
#आ.निलेश लंके हे केवळ अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर राज्याला परिचित असलेला चेहरा. कोरोना काळात त्यांच्या कामांची चर्चा देश-विदेश पातळीवर होत त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. मात्र निलेश लंके हे तसे शांत स्वभावाचे असले तरी चुळबुळे व्यक्तिमत्त्व!! शिवसेनेत असताना त्यांनी पारनेर तालुका अध्यक्ष म्हणून गावागावात शिवसेना पोहचवताना आपल्या अभ्यासू, आक्रमक कामातून कार्यतत्पर कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली. स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा कार्यक्रमा दरम्यानच “एल्गार” पुकारले आणि चर्चेत आले. निलेश लंके हे व्यक्तिमत्त्व तेंव्हापासून जिल्ह्यात चर्चेत राहिले ते आजतागायत.
शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस कडून निलेश लंकेनी निवडणूक लढवली ती आपल्याच पूर्वाश्रमीच्या शिवसेना पक्षाविरोधात!! सलग तीन वेळेस आमदार असलेले आणि विधानसभा उपाध्यक्ष असलेले विजय औटींचा पराभव करत 2019 ला जिल्ह्यात विक्रमी मतांनी निलेश लंके आमदार झाले आणि पुन्हा चर्चेत आले. मधल्या कोरोनाकाळात त्यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची झालेली सेवा तर देशभर दखलपात्र झाली, त्याही वेळी आ.लंके प्रसिद्धी आणि चर्चेच्या झोतात राहिले. मधल्या काळातही आमदर असलेले लंके कधी रस्त्यावर उभा राहून जॅम झालेली ट्राफिक मोकळी करतानाचे त्यांचे व्हिडीओ दिसून आले. अडचणीत असलेल्या आणि मदत मागायला आलेल्या व्यक्तीला त्यांनी ना जाती-पातीचा ना आपल्या-परक्या पक्षाचा म्हणून नाकारले, म्हणून “नेते” जिथे उभे असतील तिथे त्यांचा जनता दरबार दिसून येतो. या जनता दरबारातून ते अनेकांची कामे लीलया मार्गी लावतात असे त्यांचे कसब आहे.



