निलेश लंके प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन देहु येथे संपन्न !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लंके दांपत्यांपैकी एकाने लोकसभा लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह !
स्नेह मेळाव्यात प्रतिष्ठान पदाधीकार्यांना पदनियुक्ती पत्र देत केले सन्मानित !
पारनेर(प्रतिनिधी श्रीकांत चौरे):
निलेश लंके प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन सालाबाद प्रमाणे देहू येथे निलेश लंके प्रतिष्ठान कुटुंबातील स्नेह मेळावा म्हणून पार पाडला .सदर मेळाव्यास नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासह पारनेर मतदार संघातीलही हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवत कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मनोगत व्यक्त केले .त्याच सर्वाधिक सहकारी कार्यकर्त्यांची नगर दक्षिण मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लंके दांपत्यांपैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या चर्चा बहुतांशी वक्तांकडून ऐकावयास मिळाली. दरम्यान मंगळवारी देहू येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यातही प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आमदार निलेश लंके किंवा राणीताई लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आपल्या भाषणात एक प्रकारे जप केला. इतकेच नाही तर सर्वांनी सुरात सूर मिसळत 2024 चा नारा देत एक प्रकारे रणसिंगच फुंकले!
देहूत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मांदियाळी..
-अभंग मंगल कार्यालय सालाबाद प्रमाणे संपन्न झालेल्या या मेळाव्याला ज्येष्ठ मार्गदर्शक आशोकराव सावंत, निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारे, राज्य सचिव ऍड राहुल झावरे, जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर ,दीपक लंके, पारनेरचे सर्व नगरसेवक, प्रतिष्ठानचे मा.अध्यक्ष बापु शिर्के, प्रसारमाध्यम प्रमुख श्रीकांत चौरे, महीला प्रमुख सुवर्णा धाडगे,संजय लाकुडझोडे,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ बाळासाहेब कावरे,भूषण शेलार,सुभाष शिंदे, विजय डोळ, बाळासाहेब औटी सर,सचिन औटी, निपानीचे युवा उद्योजक लक्ष्मीकांत पाटील , कराडचे युवराज पाटील , राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा उमाताई बोरुडे,राष्ट्रवादी सरचिटणीस वैजयंता मते, महीला मुंबई खजिनदार सौ.सुनिताताई चौघुले , प्रतिष्ठानचे मुंबई सचिव नितीन चिकणे, खजिनदार दिलीप कोरडे, उपाध्यक्ष कैलास पावडे,संदिप चौधरी , देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी अशोक घुले, ठकाराम लंके, सचिन पठारे,पारनेरचे राष्ट्रवादी शहर प्रमुख बंडू गायकवाड कामरगावचे सरपंच गणेश साठे, सभापती भाऊसाहेब काळे , जिल्हा नियोजनचे शिवापाटील होळकर प्रतिष्ठान शहर प्रमुख अमित जाधव, शंकरशेठ चिकणे संतोष ढवळे , अजय लामखडे , हरिदास जाधव, अरनगावचे सरपंच पोपट पुंड , दत्ता खताळ , वसंत पवार मिडीया प्रमुख सुभाष कावरे ,प्रसाद नवले ,सतीश भालेकर, अमोल यादव,प्रदिप कळोंखे,किरण आहेर,सखाराम औटी,गणेशशेठ काळोखे, प्रभाकर आघाव,संदिप शिंदे,राजेश वळसे,राजुशेठ शिदे , विनोद घावटे , प्रवीन वारुळे , अभय नांगरे , सचिन काळे , सतिष गंधाक्ते , रविंद्र राजदेव , दत्ता कोरडे , बंटी दाते , यांच्यासह विविध गावचे सरपंच/उपसरपंच/चेअरमन/व्हाईस चेअरमन/संचालक व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. पाथर्डी, शेवगाव, नगर, बीड, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, निपानी , धारवाड , कराड येथूनही अनेक सदस्यांनी मेळाव्याला हजेरी लावली.
देहू ची संकल्प सिद्धी!!
-प्रतिष्ठानचे प्रांतअध्यक्ष सुदाम पवार यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लंके यांच्या हस्ते देहु येथिल स्नेह मेळाव्यात प्रतिष्ठान पदाधीकार्यांना पदनियुक्ती पत्र देत सन्मानित करण्यात आले.तसेच या मेळाव्याचे आयोजन माऊली चौधरी यांच्यासह देहूच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते.सहा वर्षांपूर्वी ठराविक विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देहू येथे पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचबरोबर निलेश लंके प्रतिष्ठानचे सुद्धा स्थापना करण्यात आली. दरम्यान येथे घेण्यात आलेला संकल्प सिद्धीस पूर्ण करत पारनेरचे मैदान आमदार निलेश लंके यांनी जिंकले. नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार व्हावा या उद्देशाने पक्षाकडून जोरदार प्रयत्न गेल्या काही टर्मला करण्यात आले. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्याच्या अनुषंगाने प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या आमदार निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना या मैदानात उतरवण्याचे पक्षश्रेष्ठीच्या मनात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
आता वेळ आली..
-देहू येथे शनिवारी झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत आपण उतरण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. निलेश निलेश लंके किंवा राणीताईंना दिल्लीत पाठवण्याच्या सुरात अनेकांनी सूर मिसळवला. ज्याप्रमाणे 2019 ला जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली. त्यानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लंके कुटुंबीयांपैकी जो उमेदवार असेल तो खासदार झाल्याशिवाय राहणार नाही कारण संपूर्ण जनतेची तीच इच्छा आहे अशा प्रकारचा मतप्रवाह उस्फूर्तपणे वाहिला.
पारनेर व्यतिरिक्त इतर तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा हीच इच्छा बोलून दाखवली. नगर दक्षिण मधील जनतेच्या मनातील खासदार हे आमदार निलेश लंके किंवा राणीताई लंके हेच आहेत अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया संबंधितांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. त्यामुळे ही निवडणूक आपण लढवावी असा आग्रह उपस्थितांनी आ . लंके यांच्यासमोर धरला.
कार्यकर्त्यांच्या मागणीवर “नेत्यां”नी भाष्य टाळले!!
-याबाबत आ.निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देणे किंवा भाष्य करणे टाळले. आपल्या मनोगतात त्यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मतभेद झाले तरी मनभेद करू नका. संघटितपणे लोकसेवा करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दिला.

