विजयी सभा कुठे होणार?
-विजयी सभा कुठे घायची हे अंतरवली मध्ये गेल्यावर ठरवू, त्यासाठी बैठक घेऊन ठिकाण आणि तारीख ठरवली जाईल.
आंदोलन संपले की स्थगित केले?
-आंदोलन स्थगित की काय यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. सरकारने अध्यादेश काढला आहे. त्या अध्यादेशाची अंमलबजावणी कशी होते, सगे सोयर्यांच्या नोंदी करताना कुणाला अडचणी आल्या किंवा आणल्या गेल्या, नोंदी सापडण्याची प्रक्रिया सुरळीत आणि तातडीने होते की नाही हे पाहावे लागेल. गरज पडली तर यासाठी सरकारला सांगावे लागेल.. त्यामुळे आंदोलना बाबत अंतरवली मध्ये गेल्यावर सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ..
हा मराठा समाजाचा खूप मोठा विजय आहे याचे वर्णन ऐतिहासिक विजय म्हणून करावे लागेल..
सग्यासोयऱ्याचा अध्यादेश म्हणजे मराठा कुणबी असल्याचा 7/12 च आहे. जसा जमीन आपली स्वतःची असण्यासाठी 7/12 हा सज्जड पुरावा असतो तसा सग्या सोयऱ्याचा अध्यादेश हा मराठा हा कुणबी असल्याचा 7/12 आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश घेत उपोषण सोडणार..