मराठा आरक्षणा बाबत जरांगे पाटलांसह सरकारचे अभिनंदन आमदार निलेश लंके
टाकळी ढोकेश्वर चौकात फटाके फोडून आ.लंकेसह कार्यकर्आत्याचा आनंदोत्सव
पारनेर(प्रतिनिधी):
गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अन्नत्याग व उपोषण करून मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर धसास लावलेला आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची मराठा समाजाची मागणी जरांगे पाटील व सरकारमुळे पूर्ण झाले असून मराठा आरक्षणाबाबत जरांगे सह सरकारचे अभिनंदन असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे दिली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह अनेक मराठा आमदारांनी हिवाळी अधिवेशनात थेट विधिमंडळा समोर उपोषण करत मंत्रालयाच्या कार्यालयाला कुलूप लावले होते तर दुसरीकडे मराठा यासंबंधी अधिवेशनात लक्षवेधी सुद्धा मांडली होती. अखेर शुक्रवारी रात्री महायुती सरकारने या मराठा आरक्षणा हेसंदर्भात अध्यादेश काढला असून आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात कार्यकर्त्यांसमवेत फटाके फोडत आपला आनंद उत्सव शनिवारी सकाळी साजरा केला आहे.
यावेळी युवा नेते दिपक लंके जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर नगराध्यक्ष नितीन अडसूळ सभापती औटी सभापती भूषण शेलार तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्यासह उपसरपंच रामभाऊ तराळ दत्ताभाऊ निवडुंगे सत्यम निमसे रवींद्र झावरे भागुजी दादा झावरे पोपट साळुंखे गुरुजी बाळशिराम पायमोडे विक्रम झावरे पप्पू कासुटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामुळे पूर्वीपासूनच आमदार निलेश लंके ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत आग्रही असून ४ दिवसापूर्वी सुपा येथे मनोज जरंग पाटलांचे आमदार निलेश लंके यांनी हार घालून स्वागत करत पाठिंबा असल्याची जाहीर केले होते.
सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर आमदार निलेश लंके म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी गेले अनेक महिन्यापासून जे आंदोलन सुरू केले आहे ते आंदोलनाला आता खऱ्या अर्थाने यश आले आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाबाबत नवा अध्यादेश काढून एक चांगला निर्णय घेऊन या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याची आमदार लंके म्हणाले.जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात उभारला होता त्या लढ्याला अखेर यश आले असून हे यश आंदोलकांचे असल्याचेही आमदार निलेश लंके म्हणाले.
या अगोदर मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार निलेश लंके व वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूभैय्या नवघरे यांचे नागपूर येथील विधानभवनासमोर उपोषण चालू केले होते.तर दुसरीकडे वेळप्रसंगी विधानसभेचे अधिवेशन सुद्धा बंद पाडण्याचा इशारा आमदार निलेश लंके यांनी दिला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाला व मराठा आरक्षण साठी आमदार निलेश लंके आमदार राजू नवघरे आमदार कैलास पाटील मंत्रालय बाहेर उपोषणास बसले होते.गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणा पासून वंचित असून त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे. जरी सरकारमध्ये सहभागी असलो तरी मराठा समाज व आरक्षण हे पहिल्यांदा व महत्त्वाचे असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. त्यामुळे या आरक्षणासाठी मराठा समाजाला आम्ही पाठिंबा जाहीर केला असून आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही आमदार निलेश लंके यांच्या सह आमदार राजू नवघरे आमदार कैलास पाटील यांनी वेळोवेळी दिला होता.अखेर महायुती सरकारने शुक्रवारी रात्री यासंबंधी अध्यादेश काढला असून याबाबत आमदार निळे संख्येने समाधान व्यक्त केले आहे.