Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
6.8 C
New York
Thursday, March 13, 2025

नगरच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात भुजबळांचा गौप्यस्फोट!! मी माझा राजीनामा..

माझा राजीनामा मी 16 नोव्हेंबरलाच दिला आणि अंबडच्या सभेला गेलो -छगन भुजबळ यांचा मोठा खुलासा..

राजीनामा मागणाऱ्यांना आणि लाथा घालण्याची भाषा करणाऱ्यांना भुजबळांनी दिले उत्तर..

नगर मधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याला ओबीसी बांधवांचा मोठा प्रतिसाद..

- Advertisement -

नगर:

खोटी शपथपत्र देत वंशावळी जुळवण्याचे बोगस काम सुरू आहे.  तुमचे आधार कार्ड जोडले गेलेले आहे, खोटी प्रमाणपत्रे देऊन काय होणार असा प्रश्न उपस्थित करत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच मी मंत्री पदावर असताना ओबीसींसाठी कसा लढू शकतो असा प्रश्न विरोधक आणि सरकार मधील काही विचारत आहेत, त्यांना माझे सांगणे आहे की मी माझा राजीनामा अंबड येथील सभेच्या आदल्या दिवशीच दिला आहे, आता सांगा त्यांना असे म्हणत छगन भुजबळ यांनी मोठा खुलासा करतानाच आपण ओबीसींच्या न्याय-हक्कांसाठी लढत राहणार असा निर्धार नगर येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केला आहे.

- Advertisement -

नगर मधे आयोजित ओबीसी, भटके-विमुक्त महाएल्गार मेळावा शनिवारी घेण्यात आला. यावेळी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ, आ.प्रकाश शेंडगे, आ.गोपीचंद पडळकर, माजीमंत्री महादेव जानकर, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, कल्याण दळे, शेखर आण्णा लिंगे, शब्बीर अन्सारी, पांडुरंग अभंग आदी ओबीसी नेते उपस्थित होते. मेळाव्यास नगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक,पुणे आदी जिल्ह्यातून ओबीसी समाजाचे बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली. एकीकडे गुलाल उधळला आणि आता पुन्हा उपोषणाची भाषा करतात. यांना साधा जीआर आणि मसुदा कळत नाही. मात्र तरीही राज्यात गावागावांत उन्माद सुरू आहे. ओबीसींना लक्ष केले जात आहे असा आरोप भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे उपोषण आणि आंदोलन मिटवल्यावर मी शपथ मराठ्यांना आरक्षण देईल ही शपथ पूर्ण केल्याचे सांगितले. मग असे असेल तर पुन्हा मराठ्यांसाठी मागास आयोगाचे सर्वेक्षण का केले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला. सर्वेक्षणात खोटी माहिती सर्रास दिली जात आहे, मात्र मोदींनी सर्वांची आधार कार्ड लिंक केलेली आहे त्यातून सर्व पुढे येईल असे सांगत भुजबळ यांनी मागास आयोगाच्या सर्वेक्षणावर भाष्य केले. एकत्र या आणि लढा असा नारा देत भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी केली. त्यांच्या सभा, डीजे रात्री उशिरा पर्यंत चालत आहेत, ओबीसींना त्रास दिला जात असून गावखेड्यात उन्माद सुरू आहे हे सांगत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करताना एकाला एक न्याय आणि आम्हांला दुसरा न्याय देऊ नकाअसेही आवाहन भुजबळ यांनी केले.

आ.प्रकाश शेंडगे यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर आता पर्यंत तीनदा गुलाल उधळून झाला आहे. मात्र आता ओबीसींचा विजयाचा भंडारा उधळला जाणार असून राज्यातील येणारी सत्ता ही ओबीसींची असेल असे सांगितले.

आ.गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी माजले असतील तर सत्ता हिसकावून घेतली पाहिजे, असा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विचार होता हे सांगत छगन भुजबळ एकटे नसून सर्व ओबीसी, भटका,मागास समाज त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

यावेळी हाके,दळे,संतसंग मुंडे, हिंगे आदींची भाषणे झाली. मा.आ.पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले. ओबीसी मेळावा संयोजक समितीचे अभय आगरकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा