देवळाली प्रवरा मध्ये प्रहार चा कामगार व पदाधिकारी मेळावा संपन्न.
देवळाली प्रवरा:
येथील नगरपालिकेच्या समर्थ बाबूराव पाटील सांस्कृतिक भवन येथे प्रहार श्रमिक सेवा संघ, प्रहार कामगार संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा कामगार व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर माऊली सांगळे, जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, धरणग्रस्त कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा सातपुते, नेवासा तालुका प्रमूख जालिंदर आरगडे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ व प्रहार श्रमिक सेवा संघाचे प्रमुख आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, उपाध्यक्ष लक्ष्मण खडके, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्यकारिणी सदस्य शरद वाळूंज, किरण पंडित, नेवासा विदयार्थी तालुका संघटक देविदास मनाळ, प्रहारचे श्रीरामपूर शहर प्रमूख सोमनाथ गर्जे, देवळाली प्रवरा शहर प्रमूख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमूख शरद खांदे, देवळाली प्रवरा महिला शहर प्रमूख भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमूख रजनीताई कांबळे, देवळाली प्रवरा शहर उपप्रमूख अशोक देशमुख, राहुरी फॅक्टरी शहर उपप्रमूख एकनाथ वाणी, राहुरी फॅक्टरी महिला शहर उप प्रमूख अफसाना शेख, वंदना कांबळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे व श्रमिक सेवा संघाचे सर्व शाखा प्रमुख, उप प्रमुख, सदस्य व मोठया संख्येने असंघटीत बांधकाम कामगार उपास्थित होते.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, धरणग्रस्त कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा सातपुते, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ व प्रहार श्रमिक सेवा संघाचे प्रमुख आप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, उपाध्यक्ष लक्ष्मण खडके, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे आदींनी यावेळी मेळाव्यास संबोधित केले.
प्रहारचे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे म्हणाले की, कामगारांनी त्यांची प्रहार मार्फत जास्तीत जास्त नोंदी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच फक्त पेटी मिळाली म्हणून थांबु नये.. तर, त्यानंतर मुदतीत कार्ड नोंदणी करून डिलिवरी पासून ते अंत्यविधि पर्यंत असलेले सर्व लाभ घ्यावेत तसेच मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत असलेले लाभ आणि विमा सुरक्षा आदी सर्व बाबींचा लाभ घ्यावा. त्यासाठी प्रहार सोबत सतत जोडुन राहावे. प्रहार कायम कामगारांना सोबत आहे. प्रहार च्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्वच वंचित घटकांपर्यंत पोहचवीन्यासाठी काम करावे. प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आदरणिय बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव आपले सोबत आहोत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ व प्रहार श्रमिक सेवा संघाचे प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रहार कामगार संघटना व प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे यांनी केले.


