भाजप 370 तर एनडीए 400 वर जागा जिंकून तिसऱ्या टर्म मध्ये सत्तेत येणार!! पंतप्रधान मोदींनी केला विश्वास वाक्य..
दिल्ली:
येणाऱ्या तिसऱ्या टर्म मध्ये भाजपचे 370 खासदार असतील तर एनडीएचे 400 पेक्षा अधिक खासदार लोकसभेत असतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अर्थ संकल्पिय अधिवेशनातील राष्ट्पतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान मोदींनी हा आत्मविश्वास व्यक्त केला.
आमच्या साठी तिसरी टर्म खूप महत्त्वाची असून अनेक मोठे निर्णय सरकार तिसऱ्या कार्यकाळात घेईल अशी महत्वपूर्ण घोषणा मोदींनी यावेळी केली. पुढील 1000 वर्षे देश एक मजबूत भारत म्हणून ओळख निर्माण करेल, त्याची पायाभरणी आमच्या तिसऱ्या कार्यकाळात असेल. आज अंतराळातही नारीशक्ती दिसत आहे. आपल्या मुली फायटर जेट चालवत आहेत. संसदेची प्रतिष्ठा सातत्याने वाढत आहे. नवी संसद नवीन आशा दिसत आहे असे सांगत विरोधक येत्या काही दिवसात प्रेक्षक गॅलरीत दिसतील अशी खिल्ली मोदींनी विरोधकांची उडवली. यावेळी काँग्रेस खासदारांनी मोदींविरोधात मोठी घोषणाबाजी केली सर सरकार पक्षाच्या खासदारांनी त्याला बाके वाजवत विरोध करत पंतप्रधान मोदींचे समर्थन केले.
सकारात्मक चर्चेची विरोधकांकडून अपेक्षा होत असल्याचा आरोप मोदींनी आपल्या भाषणात केला. काँग्रेस मुळे विरोधी पक्षाचे नुकसान होत आहे असा आरोप मोदींनी केला. काँग्रेस पक्ष घराणेशाही वर आधारित असून।काँग्रेसची घराणेशाही लोकशाही साठी घातक असल्याचे मोदी म्हणाले.
लवकरच भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. नेहरू-गांधी घराण्यावर मोदींनी टीका केली. नेहरूंना भारतीय लोक आळशी वाटायचे, इंदिरा गांधी यांचाही असाच विचार होता.
दीर्घकाळासाठी विरोधी पक्ष विरोधातच राहणार असून जनता विरोधी पक्षाला पुन्हा एकदा विरोधात बसवेल, त्यांना काही दिवसात प्रेक्षक गॅलरीत पाहावे लागेल. 80 कोटी लोकांना विनामूल्य धान्य दिले. चार कोटी गरिबांना पक्की घरे दिली, 55 कोटी गरिबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला अशी माहिती मोदींनी सभागृहात दिली. काँग्रेस सरकारने ओबीसींवर न्याय न करता अन्याय केला. कार्पोरी ठाकूर ज्यांना आम्ही नुकताच राष्ट्रपती पुरस्कार दिला ते खूप मागास समाजातील ओबीसी मधून होते. मात्र त्यांना मुख्यमंत्री होताच पदावरून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसने 1970 ला विविध षढयंत्र रचली. काँग्रेसला चिंता आहे की सरकार मध्ये ओबीसींची संख्या किती आहे,मुळात ते हेच विसरतात की देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे.