दिल्ली:
आलेल्या वृत्तानुसार शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ हे दोन्हीही अजित पवार गटाला दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. याबाबतचा केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेला निर्णय आदेश समाज माध्यमात व्हायरल झालेला आहे.
गेल्या आठ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांचा युक्तिवाद निवडणूक आयोग आयोगासमोर पूर्ण झाला होता. याबाबत दोन्ही बाजूंनी लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाने सांगितली होती, त्याची मुदत आज मंगळवारी संपत होती. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाने आपली लेखी म्हणणे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले असून आजच शरद पवार गटाकडूनही आपले लेखी म्हणणे सादर होणार असल्याची शक्यता आहे. मात्र दरम्यान शरद पवार यांच्याकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह पक्ष फुटी नंतरच्या वादात आता अजित पवार गटाकडे गेल्याचे पुढे येत आहे.