रखडलेल्या शेवगाव, पाथर्डी येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर..
नगर:
भाजपच्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील स्थगित ठेवलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मान्यतेने जाहीर केल्या आहेत.
यामध्ये भाजपाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी तुषार वैद्य, पाथर्डी तालुकाध्यक्षपदी डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
या शिवाय जिल्हा सरचिटणीस पदी शिवाजी खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष पदी दिनेश उर्फ धोंडीराम लव्हाट, जिल्हा चिटणीस पदी लक्ष्मण काशीद, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी सुनिल रासने, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी शुभम गाडे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यावेळी या दोन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावावर एकमत झाले नव्हते, त्यामुळे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार या २ तालुक्यांतील निवडी स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे दक्षिण नगर जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
