जखमी वाघ हा खूप घातक असतो हे फुटीर गटाने आणि भाजपने जाणून घ्यावे.. आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली संतप्त भावना
नगर:
राष्ट्रवादी काँग्रेस गटातील फुटीवर काल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थातच या निर्णयामुळे पक्ष स्थापन करणारे शरद पवार आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपली संतप्त भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. “जखमी वाघ खूप घातक असतो हे।फुटीर गटाने आणि भाजपाने जाणून घ्यावे” अशी तीव्र आणि सूचक प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर आलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी, आम्ही लढणार आणि जिंकणार, या संदर्भात आम्ही कोर्टात जाऊ. महाराष्ट्र हित जपण्याची जबाबदारी आता आमची आहे, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या शरद पवारांनीच पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवले आहे, हे आज फुटीर गटात गेलेल्या नेत्यांनाही त्यावेळेस माहीत होते. त्या नावावरच तुम्ही निवडून आले आणि तुम्हांला मंत्रीपदे मिळाली. त्यामुळे पवार साहेब यांचे महत्त्व राज्यातील राजकारणात किती मोठे आहे हे समजले पाहिजे. जखमी वाघ हा खूप घातक असतो हे खूप हे फुटीर गटाने आणि भाजपने या निमित्ताने जाणून घ्यावे असा सूचक इशारा आणि संतप्त प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत टीका केली आहे. निवडणूक आयोग आता भाजपची एक राजकीय विंग झाली आहे. सरकार या ठिकाणी नेमणूक करत असते. आणि त्यामुळे असंवैधाणीक पद्धतीने शरद पवार यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह फुटीर गटाला दिले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, पण ज्या बाप माणसाने पक्ष सुरू केला तो आमच्या सोबत असल्याने आम्हाला कसलीही चिंता नाही. पवार साहेब स्वतः आयोगासमोर गेले, ज्यांनी पक्षाला जन्म घातला त्यांना आयोगासमोर जावं लागलं. पार्टी वाचवण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. आपली कमिंटमेंट त्यांनी पाळली, हे महत्त्वाचे आहे. मात्र स्वहितासाठी लढणारे लोक जनतेला नको आहेत,.तर लोकांच्या हितासाठी लढणारे लोक पाहिजे. त्यामुळे यापुढेही जनता शरद पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहील असा विश्वास रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचा जनतेवरील विश्वास उडाला आहे. भाजप सरकारकडून घेतले गेलेले निर्णय जनतेला आवडत नाही आणि त्यामुळे जनता आपल्या पाठीशी उभे राहणार नाही त्यामुळे पर्याय म्हणून त्यांनी दुसरे पक्ष आणि नेते फोडणे हेच धोरण अवलंबले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे वाढले असून भविष्यात अजूनही वाढतील यावरून भाजप आणि नरेंद्र मोदी भाजपमधील लोक जनतेला घाबरलेले आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र जनता निवडणुकीत त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवेल असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्या फुटीर गटाला दिले असून आम्हाला आजच बुधवारी पक्षाचे नवीन नाव द्यायचे आहे. त्यामुळे निश्चितपणे पवार साहेब लोकांच्या मनात ते नाव असेल असेच नाव आजच आयोगाकडे सादर करतील. चिन्हाच्या बाबतीत कदाचित आज निर्णय होणार नाही, मात्र चिन्ह असेच असेल जे जनतेचे प्रतीक असेल अशी सूचक माहिती रोहित पवार यांनी माध्यमांना दिली.