राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाबाबत जसा निर्णय दिला आहे त्यापेक्षा वेगळा निर्णय येईल असे आम्हांला वाटत नाही.. आ.रोहित पवार
जामखेड(नासीर पठाण):
निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिंदे गटाच्या बाजूने निकाल बाजूने निकाल दिला आणि तसाच निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिला, त्यामुळे आमच्या राष्ट्रवादीबाबतही निवडणूक आयोगाने अचानक निर्णय घेतलेला आहे. सर्वांना माहीत होते की पंधरा तारखेला विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देणार आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय ज्या पद्धतीने दिला ते पाहता हे सर्व ठरवून चाललेले दिसते. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाबाबत जसा निर्णय दिला आहे त्यापेक्षा वेगळ्या निर्णय येईल असे आम्हाला वाटत नाही असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
मला कोणीही गद्दार म्हंटले नाही पाहिजे, एकीकडे आजोबा आजारी असतील त्यांचं वय झालेलं असेल तरी ते लढत असताना त्यांना एकट सोडून नातू पळून गेला असं मला उद्या कोणी म्हणू नये या हेतूने आणि खरा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार टिकवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढत आहोत. आणि हे इतर नेते मात्र भाजपमध्ये जात आहे.
मात्र येणाऱ्या 2024 4विधानसभा निवडणुकीनंतर सभागृहात 70 टक्के चेहरे नवीन असतील आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सामान्य कुटुंबातील असतील. पवार साहेब नवीन आणि तरुण सामान्य कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळ सामान्य कुटुंबातील लोकांचा असल्याचे आपण पाहताल असे आम्हाला वाटते असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष राजकीय पक्ष फोडत आहे कुटुंब फोडत आहे त्यावरून भाजप किती घाबरलेले आहे हे लक्षात येत आहे. त्यांना माहित आहे जनता आपल्या सोबत नाही. कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायची, कारण त्यांना आपण सत्तेत आलो नाही तर ज्यांना आपण विनाकारण त्रास दिला ते सत्तेत आले तर आपली अडचण होईल. त्यामुळे पक्ष फोडा कुटुंब फोडा असेच त्यांचे धोरण दिसते.
अजित पवार, अशोक चव्हाण अशी मोठी लोक भाजपात आल्यानंतर त्यांना मोठी पदे द्यावी लागत आहेत, त्यामुळे मूळ पक्षातील लोकांचे काय असाही प्रश्न त्यांच्या पक्षात निर्माण होणार आहे ल. मात्र 2024 नंतर भाजपची सत्ता येणार नाही असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
छोटे पक्ष संपवण्याबरोबरच पुरोगामी विचार संपवण्याचे भारतीय जनता पक्षाच धोरण ठरवलेलं दिसतेय. त्यामुळे सामान्य लोकांना मिळणारी संधी त्यांना संपवायची आहे. नव्या पिढीला नको त्या दिशेने ते घेऊन जात आहे. त्यामुळे जनतेने भाजप पासून सावध राहिला पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.