श्रीरामपूर(प्रतिनिधी:
राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावा, या निर्णयाचे श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच समाजाचा भावना शासनाकडे समजाव्यात यासाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
श्रीरामपूर येथे गुरुद्वारा श्री गुरु सभा सिख पंजाबी समाजाच्यावतीने प्रांतकार्यालयात जाऊन प्रांतअधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी गुरुबचन सिंग चुग, लकी सेठी, सरबजीतसिंग सेठी, गुलशन कंत्रोड, रिम्पी चुग, तेजेंद्रसिंग सेठी, तमन भटियानी, हिरासिंग भटियानी, अमरकसिंग चुग, अमरप्रीतसिंग सेठी ,बंटीसेठ गुरुवाडा,प्रीतीपालसिंग बतरा,मोहनसिंग कथुरिया,अमरमितसिंग चुग,मनजीतसिंग चुग,जसबीरसिंग चुग,अमरमितसिंग गुरुवाडा,गुरुमितसिंग ठकराल,श्रीकृष्ण बडाख,मनजितसिंग चुग,
आदींसह सिख समाजातील बांधव यावेळी उपस्थित होते.
निवेदनात केल्या या मुख्य मागण्या..
-राज्य सरकारकडून नेमण्यात येणारे प्रतिनिधी हे या ठिकाणी आल्यास त्यांना तख्त नांदेड येथील मर्यादा माहित नसतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे.
-सदर निर्णय हा अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक संस्थेत दखल घेण्यासाठी घेण्यात आलेला आहे.
-हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावी तसेच येत्या काळात समाजा संदर्भात किंवा समाजाच्या वास्तु संदर्भात कुठलेही निर्णय घेताना समाजातील लोकांना विश्वासात घेण्यात यावे.


