श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदीराचे गाभाऱ्यातील सर्व चांदीच्या दागिन्यासह 03 सराईत आरोपी जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
नगर:
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 12/02/2024 रोजी रात्रीचे वेळी श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदीर, पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराचे गाभाऱ्याचे कुलुप तोडुन मुर्तीचे पाठीमागील व समोरील बाजुस बसविलेले चांदीचे अर्धगोलाकार आकाराची प्रभावळ, मुर्तीचे चौथऱ्याचे समोरील चांदीचे आभुषण असे चांदीचे 24,00,000/- रुपये किमतीचे दागिने चोरुन नेलेले होते. सदर बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 140/2024 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर गावातील ग्रामदैवताचे मंदीरातील चोरीचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेवुन लागलीच पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दतीची माहिती घेवुन स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, अमृत आढाव, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, रणजित जाधव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे व अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी पथकास आवश्यक सुचना देवुन रवाना केले.
स्थागुशा पथक हे मंदीरामधील सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच यापुर्वी मंदीर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे 1) भास्कर खेमा पथवे रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस पथकाने नांदुरी दुमाला या ठिकाणी जावुन आरोपीची माहिती काढली असता सदर आरोपी हा नांदुरी दुमाला गावचे शिवारातील डोंगरावर राहत असुन त्याचे घराकडे जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने व लांबुनच त्याचे घराकडे कोणी आल्याचा त्यास संशय आल्यास तो डोंगरामध्ये पळुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने आरोपीचे राहते घराचे आजुबाजुस पायी जावुन डोंगरात 2 दिवस मुक्काम केला व आरोपी घरी आल्याची माहिती प्राप्त होताच त्याचे घरास चोहोबाजुने घेरुन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे मंदीर चोरीचे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे 2) राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे वय 30 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, 3) भाऊराव मुरलीधर उघडे वय 36 वर्षे, रा. विटा, ता. अकोले यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यातील चोरी केलेले चांदीचे दागिने हे भाऊराव उघडे याचे राहते घरामध्ये पुरुन ठेवले असल्याचे सांगुन सदरचे दागिने काढुन दिले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे 1) भास्कर खेमा पथवे वय 46 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, 2) राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे वय 30 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर व 3) भाऊराव मुरलीधर उघडे वय 36 वर्षे, रा. विटा, ता. अकोले यांचेकडुन श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदीर, पारगांव बु, ता. श्रीगोंदा येथे चोरी करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल, चोरी केलेले सर्व चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
//2//
आरोपी नामे भास्कर खेमा पथवे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात दरोडा तयारी, मंदीर चोरीचे एकुण – 16 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर तालुका 184/2005 भादवि कलम 457, 380
2. संगमनेर तालुका 246/2010 भादवि कलम 379
3. घारगांव 24/2012 भादवि कलम 379
4. घारगांव 48/2012 भादवि कलम 399, 402
5. संगमनेर तालुका 168/2013 भादवि कलम 459, 380, 511
6. नाशिक रोड, नाशिक 247/2015 भादवि कलम 379, 34
7 नाशिक रोड, नाशिक 250/2016 भादवि कलम 379, 34
8 पारनेर 209/2017 भादवि कलम 380
9 अकोले 21/2018 भादवि कलम 124
10 पारनेर 253/2018 भादवि कलम 457, 380
11 पारनेर 274/2018 भादवि कलम 457, 380
12 ओतुर, पुणे 18/2019 भादवि कलम 454, 380, 379
13 सोनई 553/2020 भादवि कलम 457, 380
14 राहाता 507/2020 भादवि कलम 457, 380
15 जेजुरी, पुणे 09/2021 भादवि कलम 380
16 संगमनेर शहर 730/2022 भादवि कलम 457, 380
आरोपी नामे राजेंद्र ठकाजी उघडे याचे विरुध्द विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खालील प्रमाणे 1 गुन्हा दाखल आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर तालुका 168/2013 भादवि कलम 459, 380
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.