राजुर(प्रतिनिधी):
महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यास राजुर पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून १०८०००० रु किमतीच्या महागड्या दहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या बाबत राजुर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राजुर शेंडी व अन्य ठिकाणच्या मोटरसायकली या चोरी गेलेले असताना या पार्श्वभूमीवर राजूर व शेंडी गावातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार उन्हाचा तपास करण्याकरता पोलीस स्टाफसह १५/०२/२०२६ रोजी घोटी तालुका इगतपुरी येथे तपासणीसाठी गेले असता सदर गुन्ह्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड (राहणार उबाडे तालुका इगतपुरी) याला ताब्यात घेऊन त्यास पोलिसांचा खाक्या दाखवल्यानंतर त्याने राजुर शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली.
त्यावरून सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटरसायकल सदर आरोपींकडून जप्त करण्यात आल्या तसेच आरोपीस विश्वासात घेतले असता त्याच्याकडे इतर मोटर सायकल बाबत चौकशी केली असता त्याने इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटर सायकल चोरी केले बाबतची माहिती दिली त्यावरून त्याच्याकडून दहा मोटरसायकली असा एकूण दहा लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपीने राजुर पोलीस स्टेशन, शहापूर पोलीस स्टेशन ग्रामीण अंबड पोलीस स्टेशन नाशिक अशा पोलीस स्टेशन हद्दीमधून या गाड्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत आरोपींवर दि.१५/१२/२०२३ रोजी राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र नं. ४२७/२०२३ भा द वि कलम ३७९ प्रमाणे शेंडी येथून अज्ञात इसमाने अंदाजे दीड लाख रुपये किमतीची बुलेट चोरीला गेले बाबत तसेच ९/१२/२०२३ रोजी गु.र.नं ४१७/२०२३ भा द वि कलम३७९ प्रमाणे राजुर येथून अंदाजे १३०००० किमतीची बुलेट मोटरसायकल चोरी गेले बाबत गुन्हे दाखल झालेले होते.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ शेख विजय मुंडे, कैलास नेहे, सुवर्णा शिंदे, पोलीस हेड काँ.अशोक गाडे, पोलीस कॉन्स्टेबल विजय फटांगरे , सांगळे यांनी केली आहे.
राजुर येथील चंद्रकांत भडांगे व भंडारा येथील संतोष पवार यांच्या मालकीच्या बुलेट मोटरसायकली चोरीस गेल्या होत्या मात्र दोन महिन्यांनी त्यांच्या या मोटरसायकल राजुर पोलिसांनी परत मिळवून दिल्या त्याबद्दल त्यांनी राजुर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.