नगर:
लोणीच्या विखे परिवाराचे वशिष्ठ हे आहे की ते ज्याही निवडणुकीत उतरतात त्यावेळेस त्यांना पक्षाची साथ असो वा नसो किंवा मिळेल तो पर्याय उपलब्ध करून जाहीर निवडणुकीला सामोरे जातात आणि ती निवडणूक लीलया जिंकतात असेच राहिले आहे. धाडसी निर्णय घेण्याचा बाणा विखे परिवारात पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्यापासून दिसून येतो, पुढे दिवंगत खासदार बाळासाहेब विखे यांनीही अनेकदा आपल्या राजकीय आयुष्यात अमलात आणला, त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिल्लीश्वर असो वा शरद पवार असो यांच्यासमोर आपले वेगळे आव्हान दाखवले हा इतिहास आहे. पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांचा बाळ कडू घेऊन आज राजकारणात असलेले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांचे “लढायचे ते जिंकण्यासाठी” प्रसंगी जो निर्णय घ्यावा लागेल ती घेण्याची वृत्ती आणि निर्णय घेतल्यानंतर मैदानात पूर्णपणे नियोजनबद्ध आणि ताकतीनेशी उतरण्याची तयारी हेच आजही विखे घराण्याचे वैशिष्ट्य आहे. यामुळेच विखेंचा दरारा राजकारण, सहकार, समाजकारण हे नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वश्रुत आहे आणि त्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात होईल याची काळजी धुरंदर विखे कुटुंब घेत आलेले आहे.
अर्थात विखे इथेच थांबलेले नाही तर आपल्या राजकीय कौशल्य आणि कार्यकर्तृत्वाची झलक ते गेल्या अनेक दशके दिल्ली दरबारही दाखवत आले आहेत. देशाचा पंतप्रधान कोणीही असो त्यांच्याशी जवळी ही विखेंची जवळीक,ओळख आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात ज्याही वेळेस मुख्यमंत्री बदलायची चर्चा सुरू होईल त्यावेळेस संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतल्या नावात विखे परिवाराचे व्यक्तीचे नाव असा परिचय अशी खास राजकीय खासियत विखे परिवाराची अधोरेखित झालेली आहे.
सन 2014 ला मोदी लाटेत केंद्रातीलच काय महाराष्ट्र राज्यातील सत्ताही काँग्रेस पक्षाच्या हातून गेली. राज्यातील सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या हातून गेली. मात्र आघाडीतील या पडझडीत नगर जिल्ह्यात टिकून राहिले ते संगमनेर मधून बाळासाहेब थोरात आणि शिर्डीतून राधाकृष्ण विखे. त्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून दिल्लीतून त्यांना महत्त्वाचे पद दिले. त्या पदाला त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत न्याय देण्याचा प्रयत्न केला. भाजपला त्यांनी घेरण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अंतर्गत संधान आणि जवळीक असल्याची चर्चाही झाली. मात्र हा प्रयत्न काँग्रेस पक्षातूनच वादादित करण्याचा प्रयत्न झाला असे बोलले जाते.
राधाकृष्ण विखे यांची फडणवीस यांच्याशी जवळीक असा हा विषय सुरू असताना सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. यावेळी विखे परिवाराने आपल्या पिढीचे पुढील राजकीय वारसदार डॉक्टर सुजय विखे यांना मैदानात उतरवण्याचे अंतिम केले. अर्थात त्यांचा ओढा हा काँग्रेस पक्षाकडेच होता. अर्थात शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने त्यांनी नगर दक्षिण मतदार संघावर दावा करत प्रयत्नांची पराकाष्टा केली. नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अखेर त्यांनी शरद पवार यांचीही मनधरणी केली. मात्र पवार साहेबांनी सुजय विखे यांना उमेदवारी न देता नगरचे आमदार संग्राम जगताप यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवले. यामागे पवार कुटुंबाकडून असलेला नेहमीचा विखे विरोध होता का अशीही चर्चा त्यावेळी झाली. मात्र निकालानंतर म्हटल्याप्रमाणे डॉ सुजय विखे पयांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लीलया जिंकली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी मताधिक्य मिळवले. आणि शरद पवार यांचे उमेदवार असलेले आमदार संग्राम जगताप यांचा दणदणीत पराभव करत पहिल्याच प्रयत्नात दिल्लीची लोकसभा गाठली. राजकारणाचा भाग सध्या असा आहे की आ.संग्राम जगताप आज काळाच्या ओघात महायुतीत असून खा.सुजय विखेंच्या जवळ आहेत.
आता वेध निश्चितच येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीचे आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका नंतर विधानसभा होणार आहेत आणि त्यामुळेच एकूणच प्रचंड असा राजकीय गोंधळ कधी नव्हे तो संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्याला कारण 2019 ते आज पर्यंत महाराष्ट्रात राजकीय अनेक उलथापालथि झाल्या ज्या अचंबित करणाऱ्या होत्या. त्यामुळेच सध्या प्राप्त परिस्थितीत 2024 साठी नगर जिल्ह्यातून पुन्हा एकदा नगर दक्षिणेसाठी डॉक्टर सुजय विखे उमेदवारीसाठी इच्छुकच नव्हे तर मैदानात उतरले आहेत. अर्थातच ते विद्यमान खासदार असल्याने त्यांचा उमेदवारीवर अधिकचा दावा असला तरी पक्षातूनच ज्येष्ठ नेते माजी मंत्री राम शिंदे यांनीही उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये असलेला घटक पक्ष अर्थात अजित पवार यांची राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही लोकसभा निवडणुकीचा चंग बांधल्याची परिस्थिती मतदारसंघात निर्माण केलेली आहे. मात्र लंके तसे स्पष्ट बोलत नसून केवळ त्यांची ही रणनीती लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी आणि विजय यासाठीची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. यामागे विखे पिता-पुत्रांनी पारनेर मतदारसंघात भाजपची ताकत वाढवली असून ऐनवेळी उमेदवारी भाजप कडे ओढून 2019ची धक्कादायक निकालाची पूर्णावर्ती करत परतफेड करण्याची रणनीती असल्याचे दबक्यावजात बोलले जात आहे. विखेंनी यासाठी तगडा “अनुभवी” उमेदवार तयार ठेवला असून याचा गौप्यस्फोट ऐनवेळी केली जाईल असे बोलले जातेय!!
विखे परिवार राजकीय आघाडी घेत साखर वाटप, केंद्र सरकारचा कोट्यवधी निधीच्या योजना सुरू करत दिल्ली दरबारी कूच करत असताना लंके दांपत्याने शिवस्वराज्य यात्रा नगर लोकसभा मतदारसंघात काढली, त्याला जोडूनच आता खा.अमोल कोल्हे सादर करत असलेले ऐतिहासिक भव्य आणि लोकप्रिय असलेले
विशेष म्हणजे या परिस्थितीमध्ये एकीकडे सत्तेतील महायुतीमध्ये विद्यमान खासदारांसमोर दोन स्पर्धक महायुतीतीलच असताना समोर विरोधी उमेदवार कोण हा प्रश्न अर्थातच मतदारसंघातील जनतेलाही पडलेला आहे. लोकसभेला नगर मतदारसंघ राष्ट्रवादी कडे राहिलेला आहे. राष्ट्रवादीची विभागणी झाल्याने काका-पुतण्या यांचा दावा असणार आहे. यात शरद पवार यांना उमेदवार द्यायचो मोकळीक आघाडीतून असली तरी लंके यांच्या सूचक वक्तव्यामुळे अजित पवार या जागेवर दावा सांगणार का? लंके खरंच निवडणुकीच्या तयारीत असतील तर साहेबां कडून की दादांच्या कडून?/की केवळ हा राजकीय हुल देण्याचा प्रयत्न असेल तर तो कशासाठी? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे साहजिकच राजकारणात धुरंदर राहिलेला विखे परिवार आता पुन्हा एकदा आपल्या भात्यातील ठेवणीतील बाण बाहेर काढत असून दिल्ली दरबारी असलेला त्यांचा एक वेगळा वकुब पुन्हा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. खासदार सुजय विखे यांच्या दिल्लीमध्ये भाजपाचे चाणक्य समजले जाणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर असलेले सर्वेसर्वा असलेले अमितभाई शहा यांच्याशी गाठीभेटी वाढल्या आहेत. निमित्त सध्या कांदा प्रश्न हा समोर आणला जात आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनुकूल निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेच कारण लोकसभा निवडणुका समोर आहेत. त्यामुळे सहकारात धुरंदर असलेले राधाकृष्ण विखे यांनीही अमित शहा यांच्याशी भेट घेत परस्थितीतची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला करून दिली आहे. या निमित्ताने केंद्राशी चर्चा होत असतानाच राजकीय दृष्ट्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगान सुजय विखे यांची उमेदवारी त्यांना अंतिम करायची आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत अमित शहा यांच्याशी झालेली भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. मीडिया प्रो असलेल्या विखे यंत्रणेने शहा भेटीचे छायाचित्र प्रसिद्ध करत केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील भाजप वर्तुळात संदेश दिल्याचे बोलले जात आहे. मधल्या अनेक कार्यक्रमांना शिर्डी-लोणी मध्ये विखे परिवाराने आवर्जून निमंत्रण दिले आणि नगर जिल्ह्यात असलेला विखे परिवाराचा दरारा एक प्रकारे अमित शहा यांच्यासमोर आणला आहे. शिर्डी सारखे आंतरराष्ट्रीय देवस्थान यामुळे भाऊक असलेले अमित शहा अर्थातच विखे परिवाराच्या प्रेमात पडले असतील तर याबद्दल नवल नाही. याच पद्धतीने स्वर्गीय इंदिरा गांधी असो किंवा इतर अनेक केंद्रीय मोठे नेते असो विखे परिवाराने देशातील शिर्ष नेतृत्वाशी नेहमीच जवळील साधली आहे. त्याचीच परिणीती आजही राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात विखे परिवाराचा एक वेगळा ठसा दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विखे पिता-पुत्रांची अमित शहा यांच्यासोबत झालेली भेट बरेच काही संकेत देणारी आहे असेच म्हणावे लागेल.