राहुरी(प्रतिनिधी-श्रीकांत जाधव):
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे अनावरण प्रसंगी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वाभिमान सभा व भव्य मेळावा बुधवारी दि ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी नवी पेठ राहुरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यास राहुरी मतदारसंघातील तीनही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे घड्याळ हे चिन्ह व पक्षाचे नांव बदलण्यास मंजुरी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षास नवीन नांव “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार” असे नवीन दिले असून पक्ष चिन्ह “तुतारी वाजवणारा माणूस” असून या चिन्हाचे अनावरण व त्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दर्जेदार पोवाडे, शिवकालीन चित्त थरारक मर्दानी खेळ, शिवकालीन सांकेतिक भाषेची प्रात्यक्षिके अशा कार्यक्रमांचे आयोजन माजीमंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
बुधवार दि ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठ येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )गटाच्या वतीने तुतारी या पक्ष चिन्हाचे अनावरण या कार्यक्रमा निमित्त कार्यकर्त्याचा भव्य मेळावा आयोजित केला होता.
सुरेश वाबळे, गौरक्षनाथ पवार – उपसभापती मार्केट कमिटी बाबासाहेब भिये, रविंद्र आढाव, सुरेश निम्से भारत तारहे विजय डोले, सुनि सुनिल अडसुरे मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब खुळे, रखमाजी जाधव प्रभाकर गाडे, विखास पवार, साहेबराव दुशिंग डॉ राजेंद्र बानकर, नितीन बाफना, सचिन भिंगाररेहे,अमोल वाघ, राहुल गवळी, विजय पालने आलिंदर वामन, पिनुमुळे अंबादास उमाळे, मित्रराज सोनवणे, इलियास रोख, रघुनाथ झिने, रामेश्वर निमसे, रोहिदास कर्डिले अभिजीत ससाणे, अमोल वाघ, डॉ. राम कदम दत्तात्रय डोकडे, संतोष पयरे श्रीकांत घोरपडे किशोर शिकारे, सर्जेराव मते, नाथा चव्हाण निखील सेलार आदी पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी तर आभार – तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी मानले.