विद्यापीठाची त्रिसदस्यीय समिती शुक्रवारी विद्यार्थ्यांशी करणार चर्चा
विद्यार्थ्यांचे तिसऱ्या दिवशी आंदोलन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसमवेत विद्यार्थी उपोषणाला, संभाजी ब्रिगेड आक्रमक..राष्ट्रीय महीला आयोग व राज्य महीला आयोग, सक्षम महीला पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
रत्नदीप मेडिकल फौडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे हे विद्यार्थ्यांची अर्थिक, माणसिक, व शाररीक पिळवणूक करत आहे असा विद्यार्थ्यांचा आरोप असून या विरोधात कॉलेजच्या विविध मागण्यांसाठी जामखेड तालुका हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपोषणास बसले आहेत. तीन दिवसा पासुन विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. कर्जत उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी विद्यार्थ्यांची चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी सदर प्रकार गंभीर असून याबाबत प्रशासन सक्त कारवाई करेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची त्रिसदस्यीय समिती आज(शुक्रवारी) येत असून त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडण्याचे आवहन करण्यात आले आहे.
रत्नदीप मेडिकल फौडेशनचे अध्यक्षांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक, अर्थिक, माणसिक व शारीरीक पिळवणूक केली जाते. संस्थेने दिलेले लेखी उत्तर मान्य नसून विद्यापीठ कुलगुरू यांनी येऊन दखल घ्यावी या मागणीसाठी हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले व रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी गुरुवार पासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे व त्यांचे सहकारी, रिपब्लिकन पार्टीचे विभागीय अध्यक्ष सुनिल साळवे, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदींनी पाठिंबा दिला.
कर्जत उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली असता विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला, विद्यार्थीनीने डॉ. भास्कर मोरे व्हॉटसअप कॉल करून माणसिक व शारीरिक हरिशमेंट करतात तसेच मेसेज पाठवतात, कोणत्याही सुविधा नसताना भरमसाठ फि आकारणी, काही मुली त्यांच्या मनाप्रमाणे वागतात त्यांना जास्त गुण देणे, तुम्ही पण त्यांच्याप्रमाणे वागण्याचा सल्ला देतात. 9 तारखेपर्यंत परिक्षा फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी अनाधिकृत आकारलेली फी, फी न भरल्यास फॉर्म भरून घेत आहेत. अध्यापणासाठी कॉलेजला कोणताच प्रकारचा स्टाफ, प्राचार्य नाही त्यामुळे कॅम्पसमध्ये तीन तास खेळण्यासाठी सोडतात. तसेच ठराविक विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष परिक्षेला मोबाईल देतात व त्यांना कॉपी पुरवली जाते असे अनेक गंभीर आरोप विद्यार्थ्यांच्या कडून करण्यात आले आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी डॉ भास्कर यांच्या कडून आर्थिक, मानसीक व शारीरिक छळास कंटाळून उद्विग्न झालेल्या मुला मुलींच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊन सहभागी असल्याचे सांगीतले. यावेळी त्यांनी विद्यापीठ नियमानुसार कोणतेही योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळतं नसून गैर मार्गाचा वापर करून फक्त पास करून देण्याची हमी दिली जाते व त्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार केले जातात. जे विद्यार्थी सहभागी होत नाही त्यांना दम देणे, मुलीना कॅबिन मध्ये बोलावून घेऊन मानसीक व शारिरीक छळ करणे असे प्रकार डॉ भास्कर मोरे कडून केले जात आहेत असा आरोप केला आहे. या कॉलेज मध्ये मुली अजीबात सुरक्षीत नाहीत असा गंभीर आरोप केला. राष्ट्रीय महीला आयोग व राज्य महीला आयोग यांना निमंत्रित करून सखोल चौकशी करावी. तसेच सक्षम महीला पोलिस अधिकारी निमंत्रीत करून मुलींच्या मानसिक शारीरिक शोषणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. डॉ. मोरे याचा शस्त्र परवाना रद्द करून जप्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे.