नगर:
नगर दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या लोकसभा उमेदवारी बाबत मोठे गूढ निर्माण झाले आहे. लंके दांपत्य आम्ही लोकसभेच्या रिंगणात असू असे स्पष्ट बोलत नसले तरी अप्रत्येक्षपणे अनेक सूचक गोष्टीतून लंके दांपत्या पैकी एकजण निश्चितपणे लोकसभेच्या आखाड्यात असणार याची मोठी चर्चा आहे. तसेच लंके हे अजितदादांची साथ सोडत शरद पवार यांची साथ देत हातात तील घड्याळ काढून हातात तुतारी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असेही बोलले जात आहे. निर्णय झाला आहे केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे असे शरद पवार गटाचे नेते खाजगीत सांगत आहेत.
हातात तुतारी घेण्यास अनेकजण इच्छुक!!
-आता आ.निलेश लंके यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आ.प्राजक्त तनपुरे यांनीही सुचकपणे यावर भाष्य केले आहे. नगर मध्ये माध्यमांशी बोलताना आ.तनपुरे यांना खा.अमोल कोल्हे यांनी महानाट्याच्या निमित्ताने आले असता आ.लंके यांना थेटपणे हातात तुतारी घेण्याचे आवाहन केले होते, यावर विचारले असता तनपुरे यांनी, आमचे पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचे नुकतेच नगर मध्ये महानाट्य झाले. त्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्हांला अपेक्षा आहे की अनेकजण लवकरच हातातील घड्याळ काढून हातात तुतारी घेण्यास सरसावतील, असे सांगितले.
लंके येणार का?? ..का नाही येणार!!
-यावर पत्रकारांनी लंके येणार का? असा थेट प्रश्न विचारला असता आ.तनपुरे यांनी थोडा पॉज घेत, “..का नाही येणार” असे सूचक उत्तर दिले. त्यावर प्रवेश कधी होणार या प्रश्नावर आ.तनपुरे यांनी, “थोडं थांबा, पण महाविकास आघाडीचा नगर दक्षिणेचा उमेदवार एकदम तोलामोलाचा असेल हे निश्चित पणे सांगतो, मात्र तो उमेदवार मी नसणार आहे” असे सांगत “उमेदवारी” याविषयावर सुचक स्पष्टीकरण दिले.
तनपुरे,पवार,ढाकणे,फाळके यांची नावे चर्चेतून मागे!!
-मध्यंतरी शरद पवार गटाकडून आ.प्राजक्त तनपुरे, आ.रोहित पवार, प्रताप ढाकणे,राजेंद्र फाळके यांची नावे चर्चेत होती. यावर आ.तनपुरे यांना तुम्ही लोकसभा लढवणार अशी चर्चा असल्याबद्दल विचारले असता, “माझे नाव चर्चेत नाही, मी विधानसभा निवडणूकच लढवणार आहे, तुम्ही बळेच माझे नाव लोकसभेसाठी चर्चेत आणू नका” असे हसत सांगत शरद पवारांचा उमेदवार तगडा आणि तोलामोलाचा असेल असे सुचकपणे उत्तर दिले. त्यामुळे आ. निलेश लंके यांच्या शरद पवार गटात येण्याच्या चर्चेला आ.तनपुरे यांनी अप्रत्यक्षपणे पुष्टी केल्याचे मानले जात आहे.