आयुष्यभर मी कार्यकर्ताच राहणार,मी पणा कधीच ठेवणार नाही..-आ.निलेश लंके
-आ.लंके यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेले, गोरेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न..
पारनेर(प्रतिनिधी श्रीकांत चौरे):
राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुरवातीपासुन संघर्ष केला. सत्तेचा उपयोग जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी राज्य सरकाराच्या योजनांचा अभ्यास करत कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला.आमदार झालो पण मी माझ्यात बदल केला नाही, मी पणा कधीच ठेवणार नाही. शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहणार अशी भावना आ.निलेश लंके यांनी व्यक्त केली.
गोरेगाव(ता.पारनेर)येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीयोजनेचे भूमिपूजन,मौजे गोरेगाव ते किन्ही घाट रस्ता करणे,गोरेगाव येथे ब्राम्हणदरा रस्ता सुधारणा करणे,गोरेगाव मानमोडी सिमेंट कॉँक्रिट रस्ता करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह करणे अश्या २७ कोटी ६३ लाख रुपयांच्या कामांचे भुमिपूजन व विविध कार्यकारी सेवा संस्थेचे कार्यालयाचे लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके,उपसभापती बापूसाहेब शिर्के, बाबासाहेब नांगरे,बबलु रोहकले, चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे,किरण ठुबे, संभाजी नरसाळे, प्रसाद नवले,उमेश नरसाळे, त्रिभवन लष्करे, चंद्रकांत शेलार,सुनिल नरसाळे,गणपत शेळके(सर),प्रविण नरसाळे, अविनाश नांगरे,सुवर्णा नरसाळे,निलेश नरसाळे, रोहीत तांबे अनिल नरसाळे,तबाजी नरसाळे, बायसाबाई नांगरे,सागर नरसाळे उपस्थित होते.
लंके म्हणाले,गावामध्ये काम करत असताना गावच्या विकासासाठी काय काय करता येईल याचा कायम पाठपुरावा अभयसिंह नांगरे व संभाजी नरसाळे व त्यांचा संपूर्ण समूह नेहमी करतो त्यामुळे मोठा निधी उपलब्ध झाला ते स्वतःसाठी कधीच काही मागणार नाही आशी ही विकासाची जोडी आहे.जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोठा निधी मंजूर झाला आहे याचे काम सुरू असताना नागरिकांनी बारकाईने लक्ष द्यावे अन्यथा काम पूर्ण झाल्यानंतर तक्रार करून काहीच उपयोग होत नाही. हे पाण्याचे काम आहे वर्षांनुवर्षे परत अडचण येणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश नांगरे, प्रास्ताविक अंबादास काकडे यांनी केले.
गीतांजली शेळकेंचा आदर्श घ्यावा ..
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कै.उदय शेळके यांच्या अकाली निधनानंतर संचालक पदाची जबाबदारी गीतांजली शेळके यांच्यावर आली मात्र मी महिला आहे हे मला हे जमेल का अशी भीती मनात न ठेवता त्यांनी ठामपणे ही जबाबदारी स्विकारत तालुक्यातील सर्व शाखांना भेटी देत तेथील अडचणी समजून घेत वेगाने काम सुरु केले इतरांना आदर्शवत काम त्यांचे आहे
-आमदार निलेश लंके