नगर-
लोकसभा निवडणुकीच्या ऐन उंबरठ्यावर नगर जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी असलेले राजेंद्र नागवडे आणि जिल्हा महिला अध्यक्षा अनुराधा नागवडे या दांपत्याने काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार) प्रवेश केला. हा काँग्रेस बरोबरच जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का होता. मात्र त्यानंतर पक्षाने तातडीने जिल्हाध्यक्षपदी जयंत वाघ यांची निवड करत काँग्रेस परिवाराशी जुनी नाळ असलेल्या कुटुंबात जिल्ह्याध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला. आता त्या अनुषंगाने जयंत वाघ चांगलेच कामाला लागले असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी तालुकातालुक्यात पक्षाची एक प्रकारे जुळवाजुळव आणि पुनर्बांधणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच कर्जत, श्रीगोंदा जामखेड असा मॅरेथॉन दौरा करण्यात आला.
बूथ लेव्हल एजंटाचे जाळे सक्षम करण्यावर
काँग्रेस पक्ष नेतृत्वाचा भर असेल असे यावेळी जयंत वाघ यांनी सांगितले. कर्जत, श्रीगोंदा जामखेड येथील काँग्रेस आढावा बैठका घेण्यात आल्या. कोणत्याही पक्षाची बांधणी भरभक्कम पणे करायची असेल तर बूथ लेव्हल एजंटांचे जाळे सक्षम करण्यावर भर द्यायला हवा आगामी काळात त्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असेल असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी सांगितले.
त्यानंतर आता पाथर्डी, शेवगाव, नेवासा येथे दिनांक ९ रोजी काँग्रेस कमिटी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक ९ मार्च २०२३ रोजी पाथर्डी, शेवगाव, नेवासा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य विधी विधीमंडळ पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या बैठका घेण्यात येत असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिली.
9 मार्च रोजी सकाळी दहा वाजता पाथर्डी दुपारी अडीच वाजता शेवगाव व सायंकाळी साडेपाच वाजता नेवासा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठका होतील. सदर बैठकीसाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, प्रदेश काँग्रेसने नेमणूक केलेले पाथर्डी विधानसभा निरीक्षक कार्लस साठे शेवगाव विधानसभा मतदार संघ निरीक्षक अभिजीत लूनिया, व नेवासा विधानसभा मतदारसंघ निरीक्षक ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल वाबळे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, मंडळ काँग्रेसचे सर्व अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, मंडल व सर्व सेल तसेच संघटना यांचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तालुका स्तरावर तसेच गाव पातळीवर बूथ लेव्हल एजंटांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. ते प्रशिक्षण तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी द्यावयाचे आहे. या बैठकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेव्हल एजंटांना देखील निमंत्रित करण्यात आलेले आहे. या एजंटनाची नोंदणी काँग्रेस पक्षाच्या आय एन सी साठी या मोबाईल अँप तसेच वेबसाईटवर जरूर आगाऊ करावी आणि त्यांनाच बैठकीला बोलवावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

